जून
१९
२०१७
तुझ्याविना....
Tweet
तुझ्याविना आयुष्यात
मज काही न गमले
बांधून पाडत होतो
आठवणींचे इमले
मज काही न गमले
बांधून पाडत होतो
आठवणींचे इमले
तुझ्याविना बघ सारे
सुनसान झाले ठेले
विसरू पाहता झाले गेले
रिचवीले पेल्यावर पेले
सुनसान झाले ठेले
विसरू पाहता झाले गेले
रिचवीले पेल्यावर पेले
झुगारुनी सारी बंधने
बेबंध आज मी झालो
पीउन बेभान वारा
मी पुन्हा पुन्हा श्रावण झालो
बेबंध आज मी झालो
पीउन बेभान वारा
मी पुन्हा पुन्हा श्रावण झालो
राजेंद्र देवी
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.