गणिताला पर्याय

 गणित हा विषय सक्तीचा न ठेवता त्याला पर्याय उपलब्ध असावा हा निर्णय अतिशय योग्य वाटतो.
हा पर्याय यापूर्वीही उपलब्ध होता आणि तोही अगदी एस. एस‌. सी. परीक्षा नुकतीच सुरू झाली त्या काळात. एवढेच काय त्यावेळी अनेक विषयांना पर्याय उअपल्ब्ध होते. गणिता ऐवजी नागरिक शास्त्र हा पर्याय होता.  संस्कृत या विषयालाही पर्याय होता . माझी मोठी बहीण त्या काळात केवळ गणिताला पर्याय होता म्हणूनच एस. एस‌. सी. पास होऊ शकली. माझ्या एका मित्राला संस्कृत अवघड वाटत होते त्यामुळे त्यानेही पर्यायी विषय घेतल्यामुळे तो उत्तीर्ण झाला. अगदी १९४८ साली  म्हणजे मॅट्रिक ही विद्यापीठाची परीक्षा होती तेव्हांही संस्कृतला अर्धमागधी हा पर्याय होता. 
  मी स्वतः अभियांत्रिकीचा पदवीधर आहे व गणित हा माझा आवडता विषय आहे तरीही शालेय शिक्षणात शिकलेल्या गणितातील फार कमी भाग पुढील विज्ञानाव्यतिरिक्त इतर शाखांच्या अभ्यासक्रमात उपयुक्त ठरतो त्यामुळे गणित विषय आठवीपर्यंतच सक्तीचा करून  १० वीच्या परीक्षेस तो अर्यायी ठेवावा हे धोरण योग्य आहे . शिक्षणाचा उद्देश केवळ परीक्षा पास होणे असा नाही असा दावा करणाऱ्यांना सध्या आपण तेच करत आहोत हे कळत नसेल असे नाही. त्यामुळे तर १०० टक्के गुण मिळवणे शक्य झाले आहे आणि गुणपत्रिकेत नापास असा शेरासुद्धा देणे ज्यांना योग्य वाटत नाही त्यांनी गणित विषयाविषयी घेतलेला निर्णय अवश्य अमलात आणावा.