जुलै २०१७

मळभ...


खरच,
तूही पावसासारखाच वागायचास
पावसासारखीच आपली अचानक भेट
वेळी अवेळी तुझं येणं
आणि माझी 'ना' ऐकताच
पावसासारखं तुझं कोसळ्नं
तुझं रागवनं आणि माझं मनवनं

यू गोड हसल्यावर
जणू इंद्रधनू पसरायचा
तुझ्या सहवासात एक एक क्षण
 मग नव्यानं हिरवळायचा

सारं आयुष्य अर्पून तुला
मी सर्वस्वी तुझी होते
खरचं आता सांगशील का?
ते तुझं प्रेम की,
मला झालेले भास होते

तु बरसलेल्या प्रेमात
मी खुलले, फुलले
जिवनातील सारे रंग मी
तुझ्या डोळ्यांनीच पाहिले

आता मला खरचं वाटतयं
ते प्रेम नक्कीच भास होते
तू कुठेतरी दुर हरवलाय
तु समोर असुनही
मी तुलाच शोधते....

खरचं,
पावसाआधिचं मळभ
मी एकदातरी
पाहिअलं असतं तर.............

-अमोल कुंभार

Post to Feed


Typing help hide