ऑगस्ट २८ २०१७

ती सध्या काय करते

खर सांगू का अगदी 
दिवसभर पाठीचा कणा मोडून 
दातांच्या कण्या करून 
रात्री  जेव्हा थकव्याची
लाट शरीरभर पसरते.
तेव्हा मला असले प्रश्नच पडत नाहीत की
'ती सध्या काय करते?'

आपण जातो मस्त शाॅवर घ्यायला साबणाची वडी
संपलेली असते.
साबणाबरोबर भाजीही आणा म्हणून बायको भाजीची पिशवी हातात थोपवते.
हसत हसत आतून कण्हत आपण मग बाजारात जातो
कळत नसत काहीतरी दिसेल ती भाजी आणतो.
भाजी नावाचा तो पाचोळा पाहून बायको जेव्हा कावते.
तेव्हा मला असले प्रश्नच पडत नाहीत की
'ती सध्या काय करते?'

रविवारचा मंगल दिवस त्यात बायको नसते घरात 
टीव्हीवर चालू होते इंडिया पाकिस्तानची मॅच.
हातात आपण घेउन बसतो थंड थंड बियरचा ग्लास
दाणे ,पापड रोस्टेड चिकनची जोडीला असते साथ.
असा जबरी माहोल असतानाही नेमकी इंडिया मॅच हरते.
तेव्हा मला असले प्रश्नच पडत नाहीत की
'ती सध्या काय करते?'

अलवारपणे डोळे  मिटून आपण स्वप्नांच्या राज्यात शिरतो.
हातात हात घालून तीच्या सोबत जून्या रस्त्यावरून परत फिरतो.
लाजून ती जवळ  येणार इतकयात बायको जेव्हा
अंगावर पाण्याची संपूर्ण बादली रिकमी करते.
तेव्हा खरच सांगतो मला असले प्रश्नच पडत नाहीत की
'ती सध्या काय करते?'

वात्रटीका

Post to Feed

छान

Typing help hide