नोटा

बुढि  बोंबले पाहुन जुन्या हजाराच्या नोटा

आव काय करू माय सगळा पैसा झाला खोटा

पै पै जमऊन पैसा उभा केला

अडाणी म्या बाईन बँकेत नाही नेला

चटणी भाकर खाऊन म्या मारलं माया पोटा

आव काय करू माय सगळा पैसा झाला खोटा 

पैश्याची पिवशी माई उंदरान नेली

गाव सोडून नाही कवा पंढरपूर ले गेली

चिंध्या करून उंदराने गोंधळ केला मोठा

आव काय करू माय सगळा पैसा झाला खोटा

उरल्या सुरल्या नोटायचा काय करू बाई

मनामंदी हुरहूर नेहमीची राई

कचऱ्यात  फेकून दिल्या ठेऊन उरावरती गोटा

आव काय करू माय सगळा पैसा झाला खोटा