नोव्हेंबर २०१८

माया

निर्जन अंधाऱ्या 
    पायवाटेवर 
अडखळले होते 
पाऊल जेव्हा 
मनोमनी गुंजत होती 
फक्त तुझीच 
आश्वासक साद ॥ 

काजळलेल्या दिशांतून 
कोंदटलेल्या अवकाशात 
अनोळखी मार्ग शोधताना 
आधार होता 
एकाकी शुभ्रप्रकाशी 
तेजाळलेल्या ताऱ्याचा ॥ 

बेदरकार वाऱ्याने 
उन्मळून पडलेले 
विराट वृक्ष पाहताना 
कोवळ्या दुर्बळ तृणपात्यांनी 
सोडली नव्हती
कधीच साथ ॥ 

म्हणून तर ...
या वादळवाऱ्यात 
आणि अनावर कोलाहलात, 
 संपत नाहीये अजूनही
    माझे असणे 
ही तर तुझीच माया - ॥ Post to Feed


Typing help hide