नोव्हेंबर २०१८

ती दोघे..!!ती दोघे 
आफ्रिकन सफारी मध्ये 
वय विचारू नका ईतकी म्हातारी 
तरी चालत असतात एकमेकाचा आधार घेत 
उस्तुकतेने बघत बसलीत 
झू मधील प्राणी ,पक्षी ,माकडे 
ती विचारत बसते बालिश उत्साहाने 
एकएक प्रश्न त्याला 
नि तोही आपुलकीनं 
करीत बसतो तिच्या शंकेचे निराकरण

मी बघत बसतो त्यांच्या प्रेमातील गोडवा 
नतमस्तक होऊन जातो 
त्याच्या समजूतदारपणापुढे

मग मीही 
हलकेच,हळुवारपणे बघत बसतो 
माझ्या बायकोकडे 
तिलाही समजावून सांगण्याचा प्रयत्न करू लागतो 
आणि ती नवलाने बघत बसते 
माझ्यातील भारतीय 
नवऱ्याकडे ..


PRAKASH


Post to Feed


Typing help hide