माझी पहिली मराठी साहस कथा : मिशन वारी

नमस्कार!

मी येथे पहिल्यांदाचं लिहीत आहे. जर चुकीच्या विभागात ही माहिती लिहिली असेल तर कृपया सांभाळून घ्यावे ही नम्र विनंती.

नुकतेच मी माझे पहिले मराठी पुस्तक प्रकाशित केले आहे. पुस्तकाचे नाव आहे "मिशन वारी". ही एक साहस कथा आहे.

-->

पंढरीच्या वारीच्या पुणे ते सासवड या टप्प्याला अतिरेकी आपले लक्ष्य करतात आणि बॉम्बस्फोट घडवून आणायची योजना आखतात. मिल्ट्री इंटीलिजन्सला याचा सुगावा लागतो आणि हे आव्हान पेलण्याची जबाबदारी टाकण्यात येते कॅप्टन आकाश आणि त्याच्या टीमवर. आणि मग चालू होतो एक थरारक खेळ. कॅप्टन आकाश आणि त्याची टीम हे आव्हान पेलू शकतील का? ते हजारो वारकऱ्यांचा जीव वाचवू शकतील का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी वाचा, पानापानाला उत्कंठा वाढवीत वाचकांना खिळवून ठेवणारी साहस कथा "मिशन वारी"!

<--

हा माझा पहिलाच प्रयत्न आहे पुस्तक लिहिण्याचा. पहिल्या शंभर प्रती संपल्या आहेत. प्रतिसाद उत्तम मिळत आहे. 

हे ११० पानांचे पुस्तक 'प्रिंट कॉपी' आणि 'ऑनलाईन रिडींग' या दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. त्या बद्दल अधिक माहिती घेण्यासाठी कृपया हि लिंक बघा: https://bit.ly/2BH0W6B

आभारी आहे!