डिसेंबर १६ २०१९

नाळ

नाळ
------
पुरण्याशी नाळ 
फार जुनी आहे आपली
कधी सुधारणार आपण ? 

जाळणं म्हणजे
सुधारणं,,,,,,,,,?
की प्रदूषणाला 
हातभार ,,,,,?
मरणाऱ्याला
कसला फरक ?
जाळा पुरा
की रस्त्यावर टाकून द्या

भुकेकंगाल कुत्र्यांच्या 
पिढ्या तरी जगतील
एकदा का होईना
पोटभरीचा ढेकर देतील
मग आपसात भांडून
राजकारण करतील
पुन्हा भूक लागेपर्यंत.

Post to Feed


Typing help hide