डिसेंबर १६ २०१९

राजा

राजा
-------
कोणता राजा म्हणू तुला
लालबागचा की गिरणगावचा
मुंबईचा की पुण्याचा 
तू तर साऱ्या विश्वाचा नियंता

तुझ्याविना कोणती पूजा
कोणता धर्म,कोणते जपजाप्य
तूच तंत्र, तूच मंत्र, तूच बिंदू
तूची आदी तूची अंत

तूच मूल, तूची विस्तार   
 तूच जगण्याचे तत्व
तूच नायक, तूच विनायक
तूच सर्वेश्वर, तूची बुद्धिदाता

तुझा हस्त वरदायक
तुझा हस्त आश्वासक
तुझा हस्त विघ्ननिवारक
तुझा हस्त आयुकारक

Post to Feed


Typing help hide