एप्रिल २९ २०२०

लॉकडाऊन माझ्यात आहे, मी लॉकडाउनमधे नाही

लॉकडाऊननी सगळीकडून बांधल्यासारखं झालंय.  

देह, मन आणि काल सगळं बंदिस्त झालं ! 

मन धावेना, पोलिसांच्या दहशतीनं शरीर जखडलं आणि काल एकाजागी थांबला. 

मृत्यूच्या भीतीचं पराकोटीचं थैमान ! मन रमवायचे सर्व उपाय निरर्थक आणि निरस झाले. प्रत्येक शक्यता जन्मताक्षणी संदेहयुक्त झाली.

सगळ्याचा परिणाम शेवटी श्वासावर झालाच ! 

श्वास अवरुद्ध झाला. काहीही होऊ शकत नाही आणि कोणताही प्रयत्न करणं व्यर्थ वाटायला लागलं. 

 लॉकडाऊन पुन्हा वाढला ! 

उरल्यासुरल्या आशा संपल्या. जबरदस्त गर्तेनं सारं अस्तित्व घेरलं.

हाच निर्वाणीचा क्षण होता ! 

आपल्याला देह नाही, तस्मात मृत्यूही नाही आणि श्वासावर आपलं काहीही अवलंबून नाही. 

आपण कायम सर्वव्यापी, अनिर्बध, मुक्त स्थिती आहोत. 

लॉकडाऊन आपल्यात आहे, आपण लॉकडाऊनमधे नाही. 

तो सिद्ध झाला ! 

Post to Feed
Typing help hide