कुणी याल का?

कवी अनिल यांची क्षमा मागून 

कुणि याल का सांगाल का ?

नवऱ्यास माझ्या लाडक्या 
रात्री जरा घोरू नको 
फुलवू नको आपुला गळा ॥धृ ॥
आधीच संध्याकाळची कामे आटोपुन घेतली
करत बसलो सांजभोजन वेळ ऐसी साधली
दूरदर्शन मालिका कुठलीहि तीही चांगली
भोजनोत्तर ही बसावे वेळ जाई चांगला ----------१
वेळ जाई भान ये  डोळे मिटाया लागले
तोच ध्यानी वेध त्याच्या घोरण्याचे लागले
घोरण्याचे विघ्न आता हीच चिन्ता लागली -------- २
सांभाळुनी मी घेतले जंव मंद्र सप्तक घोरणे
डोक्यावरी कधि शाल तर कधि कानि बोळे घातले
तार सप्तक सोसणे नच शक्य वयही जाहले --------३