फ़्रि स्पिरिट!

फ्री स्पिरीट!
परत एकदा तिचा मोठा मेसेज.. 
त्याला वावगी नाही खरं म्हणजे कलासक्ती! 
पण तो थोडा वास्तववादी! 
आज तीन महिने होतील 
तिला असं तडकाफडकी 
मुंबईला जाऊन.. 
कुठल्याश्या स्टुडिओमध्ये,
 कुठल्याश्या आर्ट फोटोग्राफरला असिस्ट करायचं म्हणून गेली! 
त्याला सांगून! 
त्याला विचारावं, 
तो म्हणेल तसेच करावं 
अशी त्याची ही नाही इच्छा, 
पण लग्नाला वर्ष पण नाही झालं अजून.. 
आणि 
त्याला सोडून 
ह्या नव्या छंदाचा असा पाठलाग
त्याच्या तरी वास्तवात नव्हता नीट बसलेला! 
नंतर वाचू 
म्हणून त्याने फोन लॉक करत
गाडी सुरू केली 
ऑफिसला जायला...
दुपारी लंच टाईममध्ये 
पाहिला मेसेज त्याने, 
 #फ्री स्पिरिट#
"मला ए ना, उंच उडायचं आहे! शोधायचं आहे 
आकाशापल्याडचे जग! 
पंखात आणायचे आहे तेवढे बळ! 
ही बंधने, 
ह्या रुढी, 
ही चाकोरी नको आहे मला मुळीच... 
एकदाच मिळते असे आयुष्य.. मारायची आहे भरारी. एकटीला... 
कुणाचे कसलेच ओझे नकोय मला आता!"
.
.
.
.
.
अजून सुद्धा होते अशा आशयाचे बरेच, 
तो खिन्नपणे वाचणार सुद्धा होता ते..
इतक्यात तिचाच परत मेसेज आला! 
"१२००० जीपे कर ना! आधीचे संपले!"
तो बाहेर पडला व्हॉटसअपमधून निमूटपणे जिपे उघडले! 
परवलीचा आकडा टाकून पैसे जात असताना 
त्याला वाटून गेलं,
की,
"आकाशामध्ये पाखरू फक्त बागडताना दिसतं आपल्याला, 
पण एरवीची त्याची दाण्यासाठीची मेहनत,
घरट्यासाठी गोळा केलेल्या कड्यांचे असंख्य तुकडे, 
आणि 
परतच्या भरारीसाठी का होई ना,
फांदीवर घेतलेली विश्रांती ही नजरेआडच राहते आपल्या कायम!"
#free_spirit
#fridaywriteups
#shortstories