"अरे करोना करोना"
अरे करोना करोना ।
किती केला रे धिंगणा ।
अबाल व्रुद्ध असो वा, ।
असो कुणी महाराणा ॥ध्रु॥
आहे जगी हे संकट ।
जन मरे पटापट ॥
न कुणा भेटे रे लस ।
कधी जाई कटकट ॥१॥ध्रु॥
सर्व आज कंटाळले।
घरी आपुल्या बैसले ॥
कामकाज काही नाही ।
तंटे खुप हे वाढले ॥२॥ध्रु॥
आता जोडुनि दो कर ।
निघून जा अती दूर ॥
करी मुक्त हा संसार ।
विनवी तुज वारंवार ॥३॥ध्रु॥
अनंत खोंडे.