जे पैशाने विकत मिळत नाही

 "डॉ. ए. जे. क्रोनीन यांनी लिहिलेले "Adventures in two worlds " हे आत्मचरित्र एकाद्या कादंबरीपेक्षाही अधिक चित्तवेधक आहे. क्रोनीन यांनी यात आपल्या आयुष्याचा पट संपूर्णपणे उलगडलेला नाही, पण त्यातील त्यांचे ठळक अनुभव कालानुक्रमे अतिशय रसाळ भाषेत निवेदन केले आहेत आणि ते अतिशय वाचनीय झाले आहेत. त्यांच्या आयुष्यातील त्या प्रसंगापैकी मला एक अतिशय आवडलेला प्रसंग खाली दिला आहे.  
       डॉ. क्रोनीन वैद्यकीय पदवीधर झाल्यावर स्वतंत्र्पणे व्यवसाय करण्यासारखी परिस्थिती नसल्यामुळे टॅनोकॅबर या खेडेवजा ठिकाणी डॉ. कॅमेरॉन या वयस्कर डॉक्टरचा सहाय्यक म्ह्णून काम करू लाग्ले. महाविद्यालयीन आयुष्यातच मेरी या तरुणीवर त्यांचे प्रेम बसले होते व तिच्याशी लग्न करण्याची त्यांची मनापासून इच्छा होती. या पार्श्वभूमीवर या निवेदनाची सुरवात होते.

"    टॅनोकबरमध्ये मला येऊन एक वर्षाहून जास्त दिवस झाले होते. आणि मला ते आवडायलाही लागले होते तरीही कधी कधी भविष्याविषयी विचार करायला लागल्यावर मी बेचैन होत असे. मेरीवर तर प्रेम मी करतच होतो आणि आमचे लग्न होण्यामध्ये असणाऱ्या अडचणींपैकी स्वतःचे घर, स्वतंत्र प्रॅक्टिस असेल तर. लग्नासाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्याची  बरीच शक्यता होती. पण वेस्ट हायलँड मधील या खेड्यात राहून ते कितपत शक्य होते?
     अश्या अनिश्चित अवस्थेत असे काही प्रसंग घडले की ते माझ्या भविष्यातील परिस्थितीला वळण लावण्यास कारणीभूत ठरले. सुरवात होण्यास कारणीभूत ठरली एक क्षुल्लक गोष्ट, आणि ती होती माशाचे हाडुक.
      माशाचे हाडुक अडकले होते जॉर्ज मॅकेलर यांच्या घश्यात आणि त्यासाठी एप्रिलमधल्या एका संध्याकाळी मॅकेलरच्या गावाबाहेर असलेल्या बंगल्यातून बोलावणे आले. जरी वरून दाखवत नसले मॅकेलर यांना बराच त्रास होत होता हे मला जाणवले. मॅकेनर हा खंबीर वृत्तीचा माणूस होता. त्यानी लग्न केले नव्हते. स्वतःच्या प्रयत्नावर संपूर्ण आयुष्याची उभारणी केल्यामुळे येणारी काहीशी तुसड व अबोल वृत्ती त्यांची होती. धान्याचा व्यापार हा त्याचा वसाय असला तरी शेअर बाजारातील कमॉडिटी मार्केटमध्ये त्यांनी चांगलाच पैसा मिळवला होता.
       सुसज्ज जेवणघरातील झगझगीत प्रकाशात मॅकेलर एकटाच जेवण घेत असताना त्याच्या घश्यात हा हाडकाचा तुकडा अडकला होता. अर्थात माझ्या दृष्टीने त्याचे निवारण करणे ही अगदीच क्षुल्लक बाब होती. माझ्या उपकरणातील चिमट्याने एका क्षणातच मी तो काढला, आणि त्याला लगेचच अतिशय मोकळे वाटले. व दीर्घ श्वास घेऊन दोन तीनदा आवंढे गिळून त्याने माझ्याकडे पाहत किंचित स्मितहास्य केले व तेवढेच त्यांच्या दृष्टीने पुरेसे होते.
 "बरेच बोचत असणार ते" तुकडा हातात घेऊन न्याहाळत मी म्हणालो.
’खर आहे, ते घशात असेतोवर मला काही चैन पडत नव्हतं. तू इतक्या तत्परतेने आलास त्याबद्दल आभार. पण आता माझे कर्तव्य मला पार पाडू दे सांग बरं यासाठी माझाकडून किती फी अपेक्षित आहे? "
"छे छे इतक्या क्षुल्लक कामाबद्दल काहीच नको मला. मला असा काय त्रास पडला आणि वेळ तरी असा कितीसा लागला? " मी अगदी मनापासून म्हटले आणि खरेच अश्या क्षुल्लक कामाबद्दल काही घेणे मला योग्य वाटतच नव्हते.
"हे अगदी मनापासून म्हणतोस तू? " मॅकेलर्ने विचारले.
"अगदी मनापासून "मी माझ्या इराद्याचा पुनरुच्चार केला. "उलट तुझ्यासाठी काहीतरी करता आलं याचाच आनंद वाटतो मला. तुलाही अशीच कधी संधी आली तर त्यावेळी त्याची परतफेड कर"
"अच्छा, मग बस तर" माझा हात धरून तो म्हणाला, "आता काही फारसे खाण्याची इच्छा नाही, स्कॉचचा (मद्याचा) छॉटा घोट घेत थोडा वेळ गप्पा मारू" आणि तो पुढे म्हनाला,
"डॉक्टर तुझ्याविषयी बरेच काही ऐकले आणि सगळेच काही अगदी न ऐकण्यासारखे होते अशातला भाग नाही. एकाद्याविषयी उगीचच चांगले मत बनवणाऱ्यापैकी मी नाही. पण आत्ताच तू म्हणतोस तशी संधी आलेली आहे. रोन व्ली विषयी कधी काही ऐकलेस का? "
"नाही बुवा पण मला वाटते हा कुठल्यातरी कंपनीचासमभाग असावा"
"बरोबर काफिर सोन्याच्या खाणीचा हा समभाग आहे. आणि त्याचा भाव बराच वाढणार आहे अशी आतल्या गोटातली माहिती मला आहे. "
"माहितीबद्दल धन्यवाद मॅकेलर, पण हा खरे तर माझ्या व्यवसायाचा भाग नाही "
"मी उगीचच सांगत नाही भल्या माणसा, मी तुला सुचवतोय त्यावर विचार कर, तुला कधीच पश्चाताप होणार नाही "माझ्या पुढ्यात व्हिस्कीचा पेला सरकवत तो म्हणाला.
         त्या रात्री मला झोप फारच कमी लागली. वर वर पाहता मॅकेलरचा सल्ला मान्य करायचा माझा मुळीच विचार नव्हता  पण आता त्याने माझ्या मनात एक ठिणगी टाकली होती आणि त्यामुळे मला वाटू लागले "काय हरकत आहे एक प्रयत्न करून बघायला. माझ्या भावी स्वप्नपूर्तीसाठी  म्हणजे घर, स्वतःचा वैद्यकीय उद्योग, आणि मेरीशी लग्न या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आव्श्यक असणारे भांडवल
प्राप्त करण्यासाठी ही एक सुवर्णसंधीच उपलब्ध झाली आहे    आतापर्यंत माझ्याकडे शिल्लकच इतकी कमी असायची की समभाग वगैरे गोष्टींचा विचारही कधी डोक्यात येणे शक्यच नव्हते. आजच्या घडीला माझी साठवलेली पुंजी होती फक्त शंभर पौंड. मी मनात विचार केला काय हरकत आहे त्याचे दुप्पाट तिप्प्ट किंवा आणखीही जास्त झाले तर? आणि शेवटी सकाळी उठल्यावर मी मॅकेलरला फोन करून माझा निर्णय कळवला.
   " तू अगदी शहाणपणाचा विचार केलास डॉक्टर " तो म्हणाला, ताबडतोब हॅमिल्टनशी बोलून घे, तो माझा ब्रोकर आहे आणि इंग्रम रोडवर राहतो तो सगळे काही व्यवस्थित करेल. माझे शब्द लक्षात ठेव तुला याचा कधीच पश्चाताप होणार नाही.
    त्यादिवशी मी काम करत होतो त्या अडेन हाउसच्या कॅमेरॉनला मी मॅकेलरविषयी विचारले,
"कसा काय माणूस आहे हा? "
" थोडा एककल्ली आहे पण बाकी अगदी सरळ आणि प्रामाणिक आहे  हा "
डॉ. कॅमेरॉनने मत व्यक्त केले. आणि तो माझा आदर्श असल्याने त्याचे मत मला महत्त्वाचे वाटले.  
      हॅमिल्टनने खरोखरच मला योग्य मार्गदर्शन केले. त्यावेळी रॉन वीसचा भाव चढा म्हणजे एक पौंड होता तेव्हा त्याने मला मार्जिनवर खरेदी करण्याचा सल्ला दिला ज्यामुळे मला १०० ऐवजी ५०० समभाग खरेदी करता आले, पुढील काही दिवस मानसिक ताण व अत्सुकता आणि आशा निराशेच्या हिंदोळ्यावर झुलण्यात गेले. वर्तमानपत्रात त्या समभागाविषयी कसलाच उल्लेख नसे किंवा मॅकेलरही मला काही फोन करत नसे. शेअरबाजार अगदी सरळ आलेख दाखवत होता आणि रोन व्हीस तर चार पाच पेन्सने घसरलाच होता. मी अगदी मूर्खपणाच तर केला नाही ना असे मी मनातल्यामनात  समजू लागलो,
दोन आठवडे असेच गेले.         पण शेवटी एक दिवस सकाळी स्थनिक वृत्तपत्र विंटन हेराल्डचा अंक मी उघडला आणि काय आस्चर्य आमच्या समभागाने अचानक ४ पेन्सची उडी मारली होती. म्हणजे मला १०० पौंडची लॉटरी लागली होती. माझ्या हर्षाला पारावार उरला नाही मी लगेच मॅकेलरला फोन केला. माझ्या आवाजात लहान मुलाला पहिल्यांदा टॉफी मिळाल्यावर होणारा आनंद होता" " आत्ताच मी न्यूज पाहिली"मी म्हणालो, "रॉन व्हीस ने कमाल केली. मग काय आता विकून टाकू ना मी " माझा उत्साह अगदी ओसंडत होता.
        मॅकेलरचा आवाज अगदी काहीच न घडल्यासरखा शांत होता, " आत्ताच विकायचं म्हण्तोस? तुला वेड बीड लागलेय काय? अरे वेड्या ही तर कुठे सुरवात आहे. मी तुला सांगेपर्यंत विकायचे नाही लक्षात ठेव " म्हणून त्याने रेसीव्हर खाली ठेवला देखील.
        उत्साहाने मी सर्जरीत प्रवेश केला. कसे बसे कामावर लक्ष केंद्रित केले. पुढचे काही दिवस  मी शस्त्रक्रिया शक्यतो लवकर आटोपून आमच्या समभागाची प्रगती पाहण्यात उरलेला वेळ घलवू लागलो. खरच मोठा गमतीचा खेळ होता तो. रोन वीज एकाद्या रॉकेटसारखा वर वर चालला होता. आठवड्या अखेर त्याचा भाव दुपटीने वाढला होता. त्या खाणीत अतिशय मौल्यवान धातू सापडला होता त्यामुळे जो तो रॉन व्हीजचे समभाग घेण्यासाठी धदपडत होता.
         आता कामापेक्षा माझे जास्त लक्ष शेअर मार्केटच्या हालचालींमध्येच गुंतून राहू लागले. आपला किती फायदा होणार याचे गणित करण्यातच माझा जास्त वेळ जाऊ लागला. माझ्या या मनःस्थितीकडे कॅमेरॉनचे बारकाईने लक्ष होते. आणि एक दिवस मॅकेलरशी फोनवर बोलून उत्साहाने मी  रात्रीच्या जेवणासाठी जरा उशीराच घरात शिरल्यावर कॅमेरॉनने जरा चढ्या सुरातच विचारले, " हल्ली तुला झालेय तरी काय? कधीच एका जागी स्थिर नसतोस, खाण्याकडे लक्ष नसते आणि तू झोपही घेतोस की नाही असं तुझ्याकडं पाहून वाटतंय. "
     " लवकरच सगळं व्यवस्थित होईल" मी सावरण्याचा प्रयत्न करत म्हनालो. "लवकरच? " कॅमेरॉन जवळ जवळ खेकसलाच "लगेच का नाही? " आणि तो पुढे म्हणाला, " हे सगळे काय आहे याची चांगली कल्पना आहे मला. आणि देवशप्पथ मला हे काही पसंत नाही. अगदी स्पष्ट सांगायचं म्हणजे तु इथं रुजू झालास त्यावेळी जो शल्य तज्ञ होतास तो आता राहिला नाहीस. आपली मूल्ये जपनारा तू ती धुळीस मिळवत आहेस त्यामुळे मी अगदी निराश आणि नाराज झालो आहे हे स्पष्टपणे सांगतो. तू सध्या जे काही चालवले आहेस ते मला मुळीच पसंत नाही. " आणि थंड मुद्रेने माझ्याकडे पाहून तो उठला आणि भोजनगॄहातून बाहेर पडला.
        दुसया दिवशी सकाळीच माझा टेलिफोन वाजला, कॅमेरॉनचे शब्द माझ्या कानात अजूनही घुमत होते. आपली कर्तव्यदक्षता दाखवून त्याचे शब्द खोटे करणे आता आवश्यक होते आणि तशी संधी लगेचच आली होती त्यामुळे मी लगेच फोन घेतला. आता माझी कर्तव्यदक्षता दाखवण्याची ही संधी होती. आणि तसे करून ~कॅमेरॉनचे शब्द खोटे करण्यासाठी मी उत्सुक होतो. "कामचुकार म्हणतो का मला आता त्याला दाखवतो’ असे मनात म्हणतच मी जॉर्ज आणि एलिझाबेथ डल्लास यांच्या पांढऱ्या रंगाने रंगवलेल्या बैठ्या घराकडे गेलो.
           डम्ड्रम कॅसलमध्ये एलिझाबेथ काम करत असे. एक हसतमुख व चटपटित काम करणारी बाई होती ती. पण वयाच्या चाळीशीत तिने वसाहतीतील मेंढपाळांपैकी एक डलास याच्याशी  लग्न केले होते. आणि ते एकदम आनंदी जोडपे होते. एलिझाबेथला आता डोहाळे लागले होते व आपल्या पतीला छोट्या गोंडस बाळाची त्यातही मुलाची भेट देण्यास ती उत्सुक होती. मी तिला यापूर्वीही अनेकदा तपासले होते
आणि तिला आता प्रसूतीकळा येत होत्या. तिची आई तिच्यासोबत होती. आणि मी पोचलो तेव्हां कळा नुकत्याच सुरू झाल्या होत्या.      मी आत शिरलो तो  त्या च्होट्या शयनगृहाच्या मागच्या खिडकीतून मागील दारी लुडबुडत असलेला डल्लास  मला दिसलाकामावर जायची त्याला घाई दिसत होती. मी माझा कोट उतरविला व बाह्या दुमडल्या.. बाईला वेदना होत होत्या पण ती मुकाट्याने सहन करत होती. पण तिच्या हालचालींवरून त्या वाढत आहेत असे दिसले. वेळ असाच चालला होता उशीरा होणाऱ्या मुलामुळे व आपल्याला चांगला सुदृढ मुलगाच व्हायला हवा या मनावरील दडपणामुळे तिच्या वेदना आणखीच वाढत होत्या. वेळ पुढे सरकतच होता अखेरीस मी निर्णय घेतला आणि  चेहऱ्यावर मुखवटा चढवला आणि तिला झोपेचे इंजेक्षन दिले बिचारी पटकन झोपी गेली आणि मग त्या तश्या अवस्थेतून तिला सोडवणे व तिच्या बाळाला सुखरूप या जगात आणण्याची माझी धडपड सुरू झाली.. तब्बल एक तास झटापट करून चिमट्याच्या सहाय्याने बाळाला बाहेर काढून तिची सुटका करण्यात मला यश आले पण मूल मात्र अगदीच पांढरे फटफटीत होते आणि  कसलीच हालचाल करत नव्हते
     एलिझाबेथच्या म्हाताऱ्या  आईने सुस्कारा सोडला आणि ती उद्गारली, " अरे देवा डॉक्टर पोर काही जिवंत दिसत नाही. मुलगाच होता पण मृतावस्थेतच जलमलाय. आणि हिला आता दुसरं पोरही होणार नाही. माझ्या कपाळावर घामाच्या धारा वाहत होत्या. त्या म्हातारीला गप्प बसवून तिच्यावर एकदम खेकसलोच"जा पळ लवकर आणि एका मोठ्या भांड्यात गरम पाणी घेऊन ये आणि दुसऱ्यात थंड पाणी. जा पळ लवकर, " त्याचबरोबर त्या पोराला मी कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्याचा प्रयत्न करू लागलो. म्हातारीने दोन मोठ्या बादल्या भरून एकीत गरम व एकीत थंड पाणी भरून आणल्यावर पोराचे ते नाजुक शरीर मी उचलले आणि प्रथम गरम पाण्याच्या बादलीत धरले अणी थोड्या वेळाने बर्फाच्या थंड पाण्याच्या बादलीत. ही क्रिया मी पुन्हा पुन्हा चालू ठेवली. मधून मधून श्वास देणेही चालू ठेवले. हे मी बराच वेळ कुठलाही फायदा न दिसता करत राहिलो. शेवटी आपण हरलो असे मला वाटू लागले आणि अचानक मुलाच्या छातीत अगदी सूक्ष्म हालचाल जाणवली.
     माझ्या शुष्क ओठातून  एक सुस्कारा बाहेर पडला आणि माझे प्रयत्न अधिक जोराने मी सुरू केले. आणि हळू हळू माझ्या प्रयत्नास त्या शरीराकडून प्रतिसाद मिळू लागला. थोडी थरथर मग खोल श्वास आणि शेवटी व्यवस्थित शास त्या शरीरात भरला जाऊ लागला.
"डॉक्टर अहो ते श्वासोच्छ्वास करू लागलेय. देवा मायबापा त्याच्यात प्राण आलाय.
म्हातारी उद्गारली.
     एकदम त्या अस्ताव्यस्त खोलीचे रूपांतर व्यवस्थित शयन गृहात रूपांतर झाले आणि अशक्त पण उत्साही एलिझाबेथने बाळाला जवळ घेऊन पाजायला सुरवात केली. तिच्या डोळ्यात आनंद आणि माझ्याविषयीची भक्ती व कृतज्ञता मावत नव्हती,
   या सगळ्या प्रकारात दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ उलटली होती आणि आत्ता मला टॅनोकब्रे ला परत जाण्याची आठवण झाली. इतका वेळ गेला होता पण मी माझ्या कर्तव्याला जागलो होतो. कॅमेरॉन आता मला काही म्हणू शकत नव्हता.
अचानक समोर पडलेल्या वृत्तपत्राकडे माझी नजर वळली व पहिल्याच पानावर मोठ्या अक्षरात बातमी होती. "रोन व्ली ने तळ गाठला. मी पेपरची घडी करून खिशात घातली आणि तसाच जोर्ज मकेलोरकडे गेलो.
"या डॉक्टर, शेवटी आपण आपली वेळ बरोबर साधली. "
" वेळ साधली? ते कसे काय" काहीच न समजून मी उत्तरलो.. माझ्या त्या तश्या शुष्क प्रतिसादामुळे मॅकेलर स्तंभित होऊन एकदम ओरडलाच
"      म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे तू विकलेस ना?
क्षणभर थांबून मी उद्गारलो, "नाही मी नाही विकले"
"काय सांगतोस काय? अरे देवा पण का? मी सकाळी नऊ वाजता तुला फोन करून कळवले होते पण तू नसल्याने तसा संदेश ठेवला होता शिवाय आणखी खात्री व्हावी म्हणून एक तारही पाठवली होती. आणि खाणीत मौल्यवान धातू वगैरे सगळा बकवास होता हे सत्य बाहेर पडायच्या आत  आपल्या शेअर्सचे भाव सर्वोच्च पातळीवर असताना ते विकायचे होते तसे केले असतेस तर तुला दुपटीने नफा झाला असता.
" माझ्याकडे एक केस आली होती मारक्लीमध्ये आणि दिवसभर मी त्या रुग्णाबरोबरच होतो  त्यामुळे तुझा संदेश मला आत्ताच मिळतोय. मी दिवसभर बाहेरच होतो. "
"दिवसभर बाहेर होतास? नेहमी माझ्या संपर्कात राहा असे सांगितले होते ना तुला त्या ऐवजी तू त्या फालतू केसमध्ये गुंतून राहिलास कमाल आहे तुझी" दात ओठ खात तो उद्गारला. "तुला सल्ला देण्याच्या उपद्व्याप पुन्हा लवकर मी करेन  असे वाटत नाही"
       पडत्या चेहऱ्याने  खट्टू होऊन मी पाय फरपटवत घरी गेलॉ. माझी खूप श्रीमंत होण्याची इच्छा धुळीस मिळालेली दिसत होती. डॉ. कॅमेरॉन शेकोटीसमोर बसला होता. थोडा वेळ कोणीच काही बोललो नाही. मी खुर्चीत बसकण मारून खिन्न मनाने चहा माझ्या कपात ओतून घेतलेला तो पाहत होता.
"फारच वेळ घेतला या केसने तुझा! "अगदी शुष्कपणे कॅमेरॉन म्हणाला. अजून कालचा त्याचा गुस्सा कायम असावा.
"हो झाला खरा" म्हणून मी थोडक्यात मी हाताळलेल्या केसची माहिती त्याला दिली.
"अरे वा, " त्याच्या स्वरात एकदम तॉ पूर्वीचा मैत्रिपूर्ण भाव प्रकतला, "अगदी योग्य केलेस तू दिवसभर थांबलास ते" क्षणभर थांबून पुढे तो म्हणाला,
" तू नसताना अगदी वेगळाच प्रकार इकडे चालू होता. ग्लासगोहून तुझ्यासाठी  सारखे  संदेश येत होते काहीतरी खरेदी करणे वा विकणे यासंबंधी" आणि मध्ये थांबून पुढे तो म्हहणाला, "पण मला त्याना सांगावे लागले की तू कामात मग्न आहेस"
"खरेच आहे" अडखळत मी उत्तरलो मी कामात दंग होतो. "
आणि एकदम मला ती डोळ्यात प्राण आणून माझ्याकडे पाहणारी एलिझबेथ,, तिची म्हातारी आई, तिचा नवरा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्या अर्धमृत बाळाच्या शरीरावर पसरलेली लाली, आणि त्याचा हसरा चेहरा ती जिवंतपणाची खूण हे सगळे माझ्या नजरेसमोरून तरळून गेलं आणि एकदम मला हलके हलके झाल्यासारखे वाटू लागले,
          ज्या दिवशी माझ्या समभागांचे पैसे घेण्याची वेळ आली तेव्हां मला फायदा तर मिळालाच नव्हता उलट ब्रोकरने मार्जिनचा आपला हिस्साही काढून उरलेल्या सात पौंड पंधरा शिलिंगचा चेक  माझ्या हातावर ठेवला. त्या क्षुल्लक रकमेच्या कागदाकडे कटू चेहऱ्याने व शांतपणे पाहताना मला एकदम काहीतरी सुचले. त्या दिवशी दुपारी जवळच्याच नॉक्सहिल शहराय जेंकिन्स या जवाहिऱ्याकडे  जाऊन तो चेक मी त्याला दिला व एका आठवड्याने त्या बैठ्या घरात एक सुंदर चांदीचा मग बाळाच्या नाव ठेवण्याच्या समारंभाच्या वेळी एलिझाबेथच्या हातावर ठेवल्यावर तिच्या चेहऱ्यावर जी चमक दिसली आणि मोठ्या अभिमानाने तिने तो आपल्या कुशीत नाजुकपणे घेतलेल्या बाळाच्या नजरेस आणला. त्यातच मला नोठी संपत्ती मिळाल्याचा भास झाला. त्या मगवर तिच्या बाळाचे नाव लिहिले होते "जोर्ज डलास ला" आणि त्याच्या खाली एक जुनी म्हण लिहिली होती. "What money can’t buy "(जे पैशाने विकत मिळत नाही