वाट..

वाट..
जुन्याच एका वाटेवर
वाट चुकले होते मी
आज पुन्हा मी
त्याच वळणावर
नवी वाट शोधते आहे मी
भांबावलेली आहे मी
गोंधळले ही आहे मी
पुन्हा पुन्हा वाट ती
शोधुन दमले आहे मी
अशी कशी मी ही वेडी
इतकी कशी मी
बावरलेली;
वाट स्पष्ट समोर असुनही
वाट शोधत भटकणारी मी
वाट हरवली आहे
म्हणुन जीवनात माझ्या
निराशेचा हा काळोख
देईल का मज करून कोणी
माझ्या नव्या वाटेची ओळख
अखेरीस कोणीतरी
हाक मजला दिली
हिच आहे ती वाट तुझी
अशी खात्री मजला दिली
ती हाक ऐकुन
धीर आता मजला आला
हाक देणारा तो आवाज
मला आता ओळखीचा वाटला
उमजले मला नंतर
ही हाक तर आहे
माझ्याच अंर्तमनाची
त्यानेच तर शोधली आहे
वाट माझ्या नव्या प्रवासाची
पुन्हा जुन्याच
त्या वळणावर
मी मजला नव्याने भेटले
माझी मलाच मी आता
नव्याने ओळखु लागले
एकदा वाटले
माझे मलाच
हा तर आहे;
परतीचा प्रवास
तेव्हा अंर्तमनाने
दिला आवाज
हा तर आहे
तुझ्या आयुष्याचा
नव्याने घडणारा प्रवास!
- Dipti Bhagat
(पुर्वप्रकाशित)