प्रणय

जितुकेच तू दिले मला
तितुकेच मी दिले तुला
प्रीतिचा व्यवहार झाला
पूर्ण‌ फळला तुला मला

रोजचीच नवी प्रीत
रोजच्याच नव्या
आणाभाका
रोजचीच नवी स्वप्ने
दोघे एकची असलो तरी

नवे नवे भेटणे
नवे नवे आकर्षण
आपुली प्रीत कशी होईल
शिळी पाकी अन् बेरंगी

सुकलेल्या संसाराचे
शुष्क भाव टाळले
ताज्या फुलांचा सुगंध
पसरला जीवनी पुन्हा पुन्हा
अरुण
९००४८०८४८६