देव आहे तरी कोठे

देव राऊळी राहतो 
असा विश्वास विश्वास
नक्की कुठे राहतो
नसे कुणास ठाऊक

देव सकाळी सकाळी
हासत उठतो
तो दुपारच्या वेळी
भिक्षा मागत फिरतो

देव दुपारी तिपारी
घेई वामकुक्षी अंमळ
तरी जागृत राही
भक्तांसाठी सर्वकाळ

देव तिन्हीसांजेला
उभा राहे विटेवरी
काळे सौंदर्य आपुले
प्रकाशी समयीच्या उजेडी

देव भक्तीने भारला
कीर्तनाच्या निरुपणी
तो जागृतची राही
चिंता भक्तांची ग करी

असा देव असूनही
आम्ही आंधळे बहिरे
एकमेकी भांडत बसतो
जातीपाती धर्म बळे

गंगाधरसुत विनवी सर्वांसी
रक्षी देव सदाकाळी
श्रद्धेचाच सर्व खेळ
भाग घ्यावा अशा खेळी

अरुण ९००४८०८४८६