मासा

माशा रे माशा
माशा रे माशा
पाण्याखाली तू
राहतोस तरी कसा ?

थंडी नाही वाजत
ऊन तर नाहीच नाही
आई बाहेर गेल्यावर
रडतोस तरी कसा ? 

रडताना आवाज
येतो का तुझा
आई मग धपाधप
मारते का तुला ? 

डोळ्यातून पाणी 
वाहतं का तुझ्या
डोळ्यातलं पाणी
दिसतं का कुणा ?

आई तुझी रूमाल
देते का तुला
नसताना खिसा
ठेवतोस तरी कसा ?

मासा म्हणाला ,
" संवयीचा परिणाम !
दुसरं काय ? 
संवय पाण्याची नाही तुला."

अरुण ९००४८०८४८६