आरसा

आरशाशी अन मनाशी
तुम्ही खोटं वागू शकत नाही
आरशाला अन् मनाला
दुसरा पर्याय नाही

आरसा फुटल्यावर नवीन आणतो
मन रोज ताजं असतं
माझी प्रतिमा दाखवता दाखवता
दोघे कधीच कंटाळत नाहीत

जिवंतपणाची एकच खूण
आरशा करता नटतो आम्ही
मनासाठी  झटतो आम्ही
कारण आरसा आणि मन लोकंच
 असतात
अरुण ९००४८०८४८६