तटस्थ


मज मोकळेपणाचा
हा काय शाप आहे
वेदना जाहल्या मज जरी
संपर्क वर्ज्य आहे

बाहेरही तयांचा
परकेपणाच दिसतो
त्यांच्या तटस्थ वागण्याने
उरात घाव बसतो

त्यांना कसे सुधारु 
सारण्या अलिप्त भावना
प्रेम सोवळे नसते
कधी कळेल त्यांना

का शब्द महाग त्यांचे
स्वस्तात काम होते
मायेच्या पाखरीला
पारखे होत गेले

जवळीक दाखवावी
असे मजसी का वाटे ?
असतील ऋणानुबंध जुने
जन्मजन्मांतरीचे

तो काळही घाबरला
पाहुनी तटस्थतेला
घालूनी मान खाली
बिचार तोंड लपवी

अरुण ९००४८०८४८६