ऑगस्ट २९ २००५

निःशब्द प्रेमाचे सुनीत

ह्यासोबत

     एकाकी कशि पाहि वाट बसची माझ्यापुढे कन्यका!
होती फारच वाचण्यात गढली ती 'आंग्ल' कादंबरी
गोरी, नाजुक, उंच, गोंडस, अती रेखीव अन् त्यावरी
     घाली निष्ठुर जीन छान विटकी, टी शर्टही 'बोलका'!

     एरिंगा, चमकी नि रंगित नखे, कोल्हापुरी चप्पल,
लाली, काजळ, मुक्त केस - अशि ती 'शोकेस' फॅशन्सची!
न्याहाळी किति वेळ मी मधुर ती 'निःशब्द' मुद्रा तिची
     झालो पागल हो, समीप बघुनी ऐसा 'खवा' केवळ!

     मज्जा अन् मग एक मस्त घडली थांब्यावरी मोकळ्या -
वारा येऊन जोरदार, उडवी सार्‍या तिच्या कुंतला.
ते ती सांवरता -अहा!! मज तिचा धक्का जसा लागला,
     गर्कन् ती वळली, मधाळ हसली, आणून गाली खळ्या !!

"सॉरी" - ती वदताच मात्र, भरले ऐसे मला कांपरे -
     घोड्याचाहि बरा, असा स्वर तिचा होता अरे बापरे!

पुणे १९८४

Post to Feed

निःशब्द!
हा हा हा
वा...वा..
छान
छान छान!
बाकी
निष्ठुर जीन, बोलका टीशर्ट, फॅशन्सची शोकेस, खवा केवळ :)

Typing help hide