काही व्याख्या

१. तत्सम शब्द


संस्कृतमधील काही शब्द मराठीत तसेच्या तसे वापरले जातात त्यांना तत्सम शब्द असे म्हणतात


उदा : कवि मति


२. अनुनासिके


ङ्, ञ्, ण्, न्, म् यांना अनुनासिके म्हणतात.

३. सामान्यरूप


नामाला किंवा सर्वनामाला विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी त्याचे जे रूप होते त्याला 'सामान्यरूप' असे म्हणतात.


उदा : 'पत्र' या शब्दाला तृतीया विभक्तीचा प्रत्यय लावल्यास 'पत्राने' असे रूप होते. यातील 'पत्रा' हे सामान्यरूप असते.



 टीप : येथील मजकूर सुखदा ह्यांनी मायबोली येथे लिहिलेल्या अनेक लेखांच्या आधारे त्यांच्या सहमतीने तयार केलेला आहे.