खुडा

  • कांद्याची पात - ४/५ पातीचे कांदे
  • मेथी - अर्धा पाव
  • लाल तिखट (पावडर)
  • मीठ
  • तेल
१५ मिनिटे
४ माणसांसाठी

कांद्याची पात व मेथी स्वच्छ धुऊन एका फडक्यावर पंख्याखाली वाळवावी (पाणी सुके पर्यंत).

पात व मेथी वेगवेगळी बारीक चिरून घ्यावी

साधारण १/२ लि. दुधाचे भांडे असते तेव्हढ्या पातीला वाटीभर मेथी टाकावी. (मेथीचे प्रमाण आपल्या आवडी नुसार कमी अधिक करावे)

चिरल्यावर एकत्र करून त्यात चवीनुसार तिखट व मीठ टाकून हाताने नीट कालवून एकजीव करून घ्यावे.

वर एक ते दीड टेबलस्पून तेल सोडून परत एकत्र करावे.  

हा खुडा पोळी, भाकरी, तळलेल्या पापडावर पसरून किंवा चिवड्या बरोबर खावा - मस्त लागतो. 

आई