ऑक्टोबर ३० २००४

तुलाही मलाही...

गडे चैन नाही, तुलाही मलाही...
सुचेनाच काही, तुलाही मलाही...

कशी कोण जाणे अकस्मात लाट
दुभंगून जाई तुलाही मलाही...

असे गाठ ही जन्मजन्मांतरीची
कळालेच नाही तुलाही मलाही...

किती यत्न केलास सोडावयाचा
तरी शक्य नाही तुलाही मलाही...

नको एकटे एकटे वाहणे हे
भवाच्या प्रवाही तुलाही मलाही...

खुल्या होउनी आज बोलाविती या
दिशा सर्व दाही तुलाही मलाही...

'कधी भेट होई? अता राहवेना
प्रवासी जराही तुलाही मलाही...'

§----- प्रवासी ३० ऑक्टोबर २००४ -----§

Post to Feed

एकदम सही !!
वा. प्रवासींची गजल मस्
वाह वा!
प्रवासी खासच!
वा!
धन्यवाद
झाली की नाही भेट
आवडले...
आभार
सुंदर!
प्रवासी-फ़िदा-भोमे!
नरेंद्रपंत आणि भोमेका
"नको एकटे एकटे वाहणे
मुके भाष्य!
वा!
सुंदर
सुरेख
असे गाठ ही
दुभंगून जाई तुलाही मलाही...
जबरदस्त !
मस्त
जबर्दस्त
वा!
सुरेख
सुंदर
अरे वा
त्यालाही

Typing help hide