अज्ञाताची स्मृतिचित्रे

आझाद हिंद सेनेची आगेकूच एप्रिल १९४३ मध्ये सिंगापूर येथून झाली हा इतिहास सर्वज्ञात आहे. जपानी सैन्याच्या सहाय्याने नेताजींच्या अधीपत्याखाली आझाद हिंद सेनेने आलौकीक कामगीरी केली आणि तो ब्रिटीश साम्राज्यावरचा निर्णायक घाव ठरला हेही ऐतीहासिक सत्य आहे.


पण आझाद हिंदची स्थापना, तीच्या स्थापनेसाठी नेताजींनी घेतलेले परिश्रम, सोसलेली मानहानी, पचवीलेली निराशा, अखेर साकारलेले स्वप्न, आझाद हिंदचा शपथवीधी, तिरंग्याचे पहिले ध्वजवंदन या गोष्टी मात्र बव्हंशी अज्ञात आहेत.


मार्च १९४१ ते फ़ेब्रुवारी १९४३ हा कालखंड नेताजींच्या अज्ञातवासाचा ठरला, ज्यात त्यांनी आझाद हिंद चे स्वप्न साकार केले.


उद्या २३ जानेवारी, नेताजींची १०९ वी जयंती, त्या निमित्त ही१९४१ ते १९४३ या कालावधीतील चित्रांजली. 


मुत्सद्देगिरी


ns5


 जर्मन मुत्सद्यांकडुन नेताजींचे अधिकृत स्वागत


 ns6


जवळ जवळ सहा महिन्यांच्या नैराश्यमय प्रतिक्षेनंतर हिटलरची भेट. इथे सगळे चित्र पालटले. हिटलरकडून भारतीय स्वातंत्र्य, आझाद हिंद सेना यांना पूर्ण व बिनशर्त मान्यता मिळाली, आझाद हिंद सेना व नेताजी यांना संपूर्ण लष्करी मदत, अर्थसहाय्य व स्वतंत्र नभोवाणी केंद्र देण्याचे हुकुम सुटले.


 आझाद हिंदची स्थापना


ns7


साशंक व नाराज अशा जर्मनीच्या ताब्यातील भारतीय युद्धकैद्यांसमोर कळकळीचे भाषण करून आझाद हिंद सेनेत सामील होण्याचे आवाहन करताना नेताजी


 ns8


भारावलेल्या सैनिकांकडून नेताजींचे उस्फ़ुर्त स्वागत.


 बिनीचे शिलेदार


 ns2


सर्वप्रथम आझाद हिंद सेनेत झालेले बंधू - गुरुमुख सिंह व गुरुशरण सिंह मंगट (बर्लिन)


  


ns1


कोनिग्स्ब्रुक येथे आपल्या सैन्याच्या पहिल्या तुकडी बरोबर नेताजी.


 


ns3


जुलै १९४२ - शपथविधीच्या प्रसंगी तिरंगा घेतलेले गुरुमुख सिंह मंगट.


 


ns4


शपथसोहळ्यात बोलताना नेताजी. ns10


हिंदू, मुसलमान, शिख व एक ब्रह्मदेशी सैनीक एकात्मतेची शपथ घेताना.


 


ns9


आपल्या सेनेसमोर शस्त्रास्त्रांसहित सलामी घेताना नेताजी


 


ns14


बर्लिनच्या जपानी दूतावासात कर्नल सातोशी यामामोटोसह


ns12


स्वप्नपूर्तिचे समाधान


युद्धाची तयारी


ns15


'डेझर्ट फॉक्स' फिल्ड मार्शल रोमेल कडून रणनिती समजून घेताना आझाद हिंदचे अधिकारी.


 


ns11


हॉवित्झर तोफांवर युद्धाचा सराव.


 


ns18


आझाद हिंद च्या सैनीकांच्या खांद्यावरील फितीवरचे बोधचिन्ह - तिरंगा व झेप घेणारा पट्टेरी वाघ.


 


ns17


आझाद हिंदची मानचिन्हे व सन्मानपत्रके


 


 


ns16


स्वतंत्र देशाची स्वतंत्र टपाल तिकिटे! - १९४३-४४ मध्ये बर्लिन येथे प्रकाशित झालेली आझाद हिंदची टपाल तिकिटे. जय जवान जय किसान तसेच चरखा व अखंड भारताचा नकाशा दाखविणारी ही तिकिटे आझाद हिंद्ची स्वराज्याची कल्पना काय होती ते स्पष्ट दाखवीतात.


जय हिंद