मराठी भाषेच्या मर्यादा.

मित्रहो,


मी काही विचारवंत वगैरे नाही, की कोणी भाषा शास्त्रज्ञ नाही. पण मला जे जाणवलं, ते फक्त व्यक्तं करतोय.


आपली मराठी भाषा ही आपल्या साठी नक्कीच अभिमानाचा विषय आहे. पण आपण जेवढं गुणगान मराठीचं करतो तेवढी ती खरंच worth आहे का?


असे अनेक शब्द आहेत जे आपण चक्क मराठी म्हणून वापरतो. उदा. जखम - हा उर्दू शब्द आहे, खर्च - हा ही उर्दूच, हवा - उर्दू.


ही केवळ काही उदाहरणे झाली. अशी अनेक आहेत.


दुसरी गोष्ट अशी, की ह्या शब्दांचे पर्यायी मराठी शब्द जर आपण वापरले, तर आपल्याला आपण मराठी बोलतोय असं वाटणारंच नाही.


म्हणजे - मला पायाला क्षतं(जखम) झाली आहे. आपण वायु(हवा) खायला फिरायला जाऊ. इ.इ.


आता खरा मुद्दा हा आहे, की मराठी ची ही अवस्था कशामुळे झाली? हा दोष मराठीचा आहे की मराठी वापरणाऱ्या लोकांचा?


आपलं काय मत आहे??