स्वातंत्र्यवीर सावरकर

ज्यांनी १८५७ च्या हुतात्म्याना हौतात्म्य मिळवुन दिले, ज्यांनी बदनाम ठरवलेल्या बंडाला स्वातंत्र्यसमर हे नाव दिले ते स्वातंत्र्यवीर सावरकर.लोकशाहीच्या पुरस्कर्त्यांनी ज्यांचे हस्तलिखित ग्रंथांतरीत होण्यापूर्वी भयग्रस्त होवुन जप्त केले अणि तरीही जो ग्रंथ हॉलंड, अमेरिका व हिंदुस्थानात प्रसिद्ध झाला व लाखोंकडुन मुखोद्गत केला गेला, ज्या ग्रंथाने पुन्हा एकदा क्रांतीची ठिणगी पेटवली त्या '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' चे लेखक सावरकर


ज्यांनी खिळ्याची लेखणी व भिंतीचा कागद करुन कमलाकाव्य लिहिले, ज्यांच्या आवाहनातही आव्हान होते ते महाकवी सावरकर, श्रोत्यांना स्फुरण देणारे वक्तृत्त्व लाभलेले वक्ते सावरकर, ज्यांनी भावी स्वतंत्र हिंदुस्थानची भाकिते केली ते द्रष्टे सावरकर.


ज्यांनी सागरात झेप घेउन समुद्र पार केला, ज्यानी ५० वर्षे शिक्षा देणाऱ्याला 'तुमचे राज्य तोपर्यंत टिकेल का?' असा सवाल केला,ज्यांनी अनेक देशभक्तांना हौतात्म्यास प्रवृत्त केले, ज्यांनी पुस्तकात लपवुन पहिली २० ब्राउनिंग पिस्तुले हिंदुस्थानात पाठविली ज्या पिस्तुलापैकी एकाने हुतात्मा अनंत कान्हेरेच्या हातातुन जुलुमी जॅक्सन ला संपवला, ज्याने अंदमानच्या नरकात अनन्वित छळ सहन केला, ज्याच्या ग्रंथाने भगतसिंह प्रभृतिंना प्रेरणा दिली, ज्यांनी नेताजीना हिन्दुस्थानाबाहेर निसटुन जाउन आपले कार्य प्रगत करण्याचा बहुमोल सल्ला दिला ते क्रांतिकारक सावरकर


ज्यांनी आयुष्याचा तुरुंगवासानंतरचा काळ समाजकारणासाठी सार्थकी लवुन अस्पृश्यता, जातीभेद या विरुद्ध लढा दिला, ज्यांनी अंधश्रद्धेवर आसुड ओढला, ज्यांनी राष्ट्रीय एकात्मतेचा पुरस्कार केला ते समाजसुधारक सावरकर.


स्वतंत्र हिंदुस्थानातही गुन्हेगार ठरलेले व पुन्हा मृत्युनंतर चार दशकांनी ज्यांच्या राष्ट्रभक्तिचा ज्यांनी राष्ट्रासाठी काहिही केले नाही अशा नेत्यांकडुन अपमान झालेले ते दुर्दैवी देशभक्त सावरकर.


आणि तरिही कोट्यावधी भारतीयांच्या ह्रुदयात ज्यांना अढळ स्थान आहे ते स्वातंत्र्यवीर सावरकर.


या महान स्वातंत्र्यवीराच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त नतमस्तक अभिवादन.