गमभन - ऑनलाईन/ऑफलाईन टंकलेखन सुविधा

गमभन - टंकलेखन सुविधा

आज आपल्या सर्वांसाठी 'गमभन - टंकलेखन सुविधा' सादर करताना मला कार्यसाफल्याचा आनंद होत आहे.
ऑफलाईन आणि उच्चारानुरूप टंकलेखन करण्यासाठी बरेच जण शोध घेत होते/आहेत. आज मी मनोगताच्या टंकलेखन सुवेधेशी मिळती जुळती आणि उच्चारानुरूप चालणारी ऑफलाईन/ऑनलाईन टंकलेखन सुविधा आपल्या वापरासाठी येथे देत आहे.

ही सुविधा आता 'गमभन' इथे कार्यन्वित आहे. ही सुविधा आपल्याला संगणकावरही उतरवून घेता येईल आणि वापरता येईल.

सद्ध्या ही प्रणाली बाळबोध अवस्थेत आहे. संगणकावर क्लायंट-साईड जावा स्क्रिप्टींग सपोर्ट आवश्यक आहे. तसेच इंटरनेट एक्सप्लोरर शिवाय इतर ब्राऊसर वर मी याची पडताळणी घेतलेली नाही. वेळ/सुचना/कल्पना मिळत जाईल तसेतसे या सुविधेत बदल करण्याचा मानस आहे.

या सुविधेत उपलब्ध असलेले पान आपण डाऊनलोड करून घ्यावे.
आंतरजालाशी संबंध असताना आणि नसतानाही आपण त्यातील मजकूराच्या जागी आपले लिखाण करू शकाल. त्याकाळापुरती पॉपाअप खिडक्यांना आडकाठी ठेऊ नये.

ते संग्रहित करण्यासाठी आपल्याला सद्ध्यातरी ते सिलेक्ट ऑल करून युनिकोड युक्त फाईल मध्ये डकवावे लागेल आणि मग ते संग्रहित होईल.
त्यानंतर आपण जेव्हा मनोगतावर याल, तेव्हा त्या फाईल मधून आपण ते लिखाण मनोगतावर डकवू शकाल.

आपल्या सुचनांचे, कल्पनांचे स्वागत आहे.

मला जिओसिटीस वर स्क्रिप्टींग असलेले पान टाकण्यास मज्जाव आहे. कोणाला मोफत सर्व्हरची एखादी सोय ठाऊक असल्यास कृपया कळवावे.

-------------------------------------------------------

ही सुविधा मुक्त प्रणाली स्वरुपात आहे. असे असले तरी कोणाला यात बदल करावयाचे असतील अथवा सुधारणा करायच्या असतील तर ह्याबाबत माझी अनुमती घ्यावी अशी माझी प्रांजळ अपेक्षा आहे. ही सुविधा विक्रीसाठी नाही. याचा गैरवापर केल्यास होणाऱ्या परिणामांना मी जबाबदार असणार नाही.

-नीलहंस-ॐकार जोशी