आत्माहुतिचा अमृतमहोत्सव

आज हुतात्मा चंद्रशेखर आजाद (चंद्रशेखर सीताराम तिवारी) यांच्या तेजस्वी बलिदानास ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे ते अखेरपर्यंत 'आजाद' राहीले, अनेक वर्षे जंग जंग पछाडूनही इंग्रज सरकार त्यांना पकडु शकले नाही.


एकदा भूमिगत क्रांतिकारक आग्रा येथील मुक्कामी असताना उघड्याबंब बसलेल्या आजादांकडे पहात भगतसिंह हसत म्हणाले की पंडितजी, तुम्हाला फ़ाशी द्यायचे तर इंग्रजाना दोन दोर आणावे लागतील, एक गळ्यात आणि एक पोटाभोवती. त्यावर एकदम उसळत आजादांनी आपले कमरेला डावीकडे खोचलेले मॉवजर उजव्या हातात घेतले आणि ते म्हणाले, देखो रणजीत (भगतसिंहांचे एच.एस.आर.ए. मधील सांकेतिक नाव) ये रस्सा फ़स्सा तुम्हे मुबारक हो, मुझे फ़ासी जानेका कोइ शौक नही. जब तक यह बमतुल बुखारा मेरे पास है, कोइ माई का लाल अपनी मा का दूध नही पिया जो हमे जिवीत पकड ले जाये.


हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांच्या ७५ व्या आत्माहुतिदिनानिमित्त त्यांना ही आदरांजली.


 'आजाद चा जन्म'


a1 फ़टक्यांची शिक्षा वंदे मातरम च्या जयघोषात  भोगुन बाहेर आल्यावर जनतेने उस्फ़ुर्त सत्कार केला त्यावेळाचे हे प्रकाशचित्र.


'सुप्रसिद्ध पवित्रा'



a2 आजाद यांचे हे सुप्रसिद्ध चित्र भगवानदास माहोर यांनी झाशी येथील मुक्कामी आजाद स्नानगृहातून अंघोळ करून बाहेर पडताच टिपले. दक्षता म्हणून क्रांतिकारक स्वतःचे प्रकाशचित्र काढून घेत नसत.


'सुपरिचीत छबी'



a3


वरील प्रसंगीचे हे समीपदृश्य - हे अनेक ठिकाणी दिसून येते.


'अखेरचा संग्राम'


 a4


आजादांना आल्फ़्रेड पार्क येथे हौतात्म्य प्राप्त झाल्यावर अनेक क्रांतिकारकांनी व नेत्यांनी त्यांचा मृतदेह ताब्यात मिळविण्यासाठी सरकारकडे अर्ज दाखल केले. मात्र सरकारने नकार देत परस्पर अंत्यसंस्कार करून टाकले. या माणसाची भिती सरकारला मृत्य नंतरही वाटत असावी. ज्या जांभळाच्या झाडाखाली आजादांनी आत्माहुति दिली त्याच्या तळातली माती कपाळाला लावण्यासाठी व त्या वृक्षाचे दर्शन घेण्यासाठी जनतेने आल्फ़्रेड पार्क मध्ये रिघ लावली. संतप्त इंग्रजांनी रातोतात हे झाड पार नष्ट करून टाकले.