लेखन करण्याची १० कारणे

लेखन करण्याचे प्रत्येकाचे आपले एक कारण असणार.  पण काही कारणे ही सार्वत्रिक कारणे आहेत.  ही १० कारणे महाजालावर वाचलेल्या अनेक लेखांमधून आहेत.  मनात जशी राहिली आणि जी पटली ती इथे संकलित करतोय.  आपणही आपापले लेखनाचे कारण जोडावे, संवाद कायम ठेवावा.



  1. संवाद साधण्यासाठी

    लेखनाचा उद्देश बरेचदा संवाद साधणे हा असतो.  कधी कधी आपण स्वतःशी संवाद साधण्यासाठी पण लेखन करू शकतो आणि करतो.  आता आपण आपली लेखन शैली समृद्ध करायला लिहितो, तर कधी यादी लक्षात ठेवायला लिहितो.  कधी प्रेयसी पर्यंत पोहोचण्यासाठी लिहितो तर कधी परगावी असताना वडिलांना पैसे मागण्यासाठी.  संवाद साधने ही खूप मोठी कामगिरी लिखाणाने करता येते.


  2. गोष्ट सांगण्यासाठी

    कितीतरी गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात.  गोष्टींशी अनुरूप होते व तिला पुन्हा जगण्याचे एक साधन आहे लिखाण.


  3. मत प्रदर्शन

    आपले मत नक्की काय आहे याची माहिती आपल्यालाच मिळवायची असेल तर ते लिहून काढावे.  एकदा पांढऱ्यावर काळे झाले की आपल्यालाच आपल्या मतात असलेला विस्कळितपण दिसू शकतो आणि तो मग दूर करता येतो.  लेखन आपल्याला आपले मत पक्के करायची संधी देते.


  4. चित्र जपण्या साठी

    आपण पाहिलेली सुंदर वस्तू,  रम्य ठिकाण आपण लिखाणात बंदिस्त करून ठेवायचा प्रयत्न करतो.  ते एक प्रकारचे शब्द चित्र असते.  अनुभव टिपण्यासाठी लिखाण हे उत्तम साधन आहे.


  5. भावना मांडण्यासाठी

    कधी कधी बोलताना आपला अहं बुद्धीला बोलू देत नाही.  आपल्या भावना शांतपणे मांडण्यासाठी आपण लेखनाचा आधार घेऊ शकतो.  शब्दात मांडल्यावर भावना प्रखर होतात.


  6. कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी

    मनात असलेली कलाकृती निरंतर लक्षात ठेवण्यासाठी व जपण्यासाठी आपण लेखनाचा वापर करू शकतो. 


  7. मन मोकळे करण्या साठी

    मन मोकळे करण्यासाठी आजवर कितेक लोक रोजनिशी लिहीत आलेत व लिहीत राहतील.  मन मोकळे करण्याचे लेखन एक सोपे आणि परिणामकारक साधन आहे.


  8. पात्राला आयुष्य देण्यासाठी

    कथाकार आपल्या मनात असलेल्या व्यक्ती आणि वल्लींना आयुष्य देण्यासाठी लेखनाचा आधार घेतात.  ते पात्रे लिहून सादर करतात त्यांच्यात प्राण टाकतात.


  9. काल्पनिक जग तयार करण्यासाठी

    विज्ञान व कल्पना या दोहोंच्या साहाय्याने नवं नवे जग तयार करण्यासाठी लेखक शब्दांचा आधार घेतात.  भविष्य कसे असेल हे चित्र किंवा भूत कसा होता हा इतिहास लिखाणाने साकार करता येतो.


  10. स्वतःचा स्वभाव व्यक्त करण्यासाठी

    आपण जे लिहितो त्यात कुठेतरी प्रकट होण्याची एक ऊर्मी असते.  वेगवेगळ्या प्रतिमा वापरून आपला स्वभाव पुन्हा पुन्हा कागदावर प्रकट होऊ पाहत असतो.