एप्रिल २००६

हृदयविकारः ३-श्वसनक्षमता

ह्यासोबत

हृदयविकारः ३-श्वसनक्षमता संवर्धन

इतर रोगांमध्ये जसे स्टेथोस्कोप छातीवर लावून निदान करतात, त्याउलट हृदयविकारात पाठीवर स्टेथोस्कोप लावून श्वसनक्षमतेचे निदान करतात. श्वसनक्षमता ऑलिम्पिक खेळाडूंमध्ये १५ टक्केपर्यंत असू शकते, सामान्य लोकांत ती पाच ते दहा टक्के असते तर हृदयरुग्णांमध्ये ती २.५ टक्क्यांपर्यंत घटलेली सापडते.

कापडी टेपने छातीत पूर्णपणे श्वास भरून घेऊन छातीचा घेर मोजावा. समजा तो 'भ' सेंटीमीटर आहे. कापडी टेपनेच छातीतील उच्छवास पूर्णपणे निष्कासित करून छातीचा घेर मोजावा. समजा तो 'र' सेंटीमीटर आहे. तर भ उणा र भागिले र ह्या संख्येस शंभरने गुणल्यास टक्क्यांमध्ये श्वसनशक्ती मिळते.

ही श्वसनशक्ती कुणीही, कधीही मोजू शकतो. ती वाढवावी. वाढल्याची नोंद ठेवावी. असे नेहमी केल्यास अवनतीकारक रोग आसपासही फिरकणार नाहीत.

श्वसनशक्ती कशी वाढवावी? उत्तरः प्राणायामाने. योगासनांनी. व्यायामाने. मात्र हे सारे करण्याचे प्रयोजन श्वसनशक्ती वाढविणे हे असले पाहिजे.

३० अधिक वयात छातीचा पिंजरा पूर्णपणे तयार झालेला असतांना श्वसनशक्ती वाढते कशी? तर आपण छाती जास्त फुगवून अधिक प्राण भरून घेऊ शकत नसलो तरीही छाती पूर्णपणे रिकामी करून अंतरंगातील साठलेला कर्बद्विप्राणिद पूर्णपणे निष्कासित करण्यात यशस्वी होतो. आपली छाती जास्त मोकळी होऊ लागते. आणि श्वसनशक्ती वाढू शकते. हेच साधण्याचा भरकस प्रयत्न करावा.

Post to Feedछान
नको..
चांगली लेखमाला.
विचार प्रवर्तक..
श्वसनक्षमता
हो,आपला अंदाज खरा आहे!
धन्यवाद!

Typing help hide