' शोध '

शोधतो ते सुर हळवे


आर्त जखमी गीतातुनी


शोधतो चेहरे नवे ते


भंगल्या प्रतिमातुनी


 


शोधतो विरहात ही मी


सोनेरी क्षण सुखातले


जळणाऱ्या ग्रीष्मातही मी


शोधितो का रानफुले


 


शोधतो का गवसले


शोधतो का हरवले


शोधतो ते अर्थ वेडे


निरर्थक जगण्यातले


 


शोध तुझा घेऊनी थकले


शरीर मन अन श्वास ही


तरीही संपेचना हा शोध अन


अन जीवनाचा प्रवास ही