एक सोपे कोडे

तुम्ही रस्त्याच्या मध्यभागी उबे आहात. रस्त्याच्या पूर्वेला किंवा पश्चिमेला पोस्ट ऑफिस आहे. नक्की कोणत्या दिशेला ते तुम्हाला शोधायचेय.

तुमच्या मदतीसाठी दोन व्यक्ती उभ्या आहेत. त्या तुम्हाला पोस्ट ऑफिस कोणत्या दिशेला आहे ते सांगतील, परंतू त्यातील एक व्यक्ती खरं बोलणारी असेल तर एक खोट बोलणारी.

अट फक्त एकच. तुम्ही कोणत्याही एका व्यक्तीला फक्त एकच प्रश्न विचारू शकता.


तुम्ही कोणता प्रश्न विचाराल ज्याने तुम्हाला पोस्ट ऑफिस कोणत्या दिशेला आहे ते कळेल?