जून १३ २००६

नविन मराठी शब्द

 

मराठीत संगणन विषयावर लेख लिहितांना एक मोठीच अडचण जाणवते. ती म्हणजे, संबंधित शब्दांच्या अपुरा पुरवठा. मध्यंतरी गुगलचा गुगली या विषयावर माझ्या अनुदिनीवर लेख लिहिण्यासाठी मी सुरूवात केली खरी. पण, शब्दांमुळे गाडं अडलं. त्यामुळे सामान्यतः आज्ञावलीच्या चव-या ढाळणारा मावळा सहसा जे करेल तीच वाट मी चोखाळली आणि माय-मराठीत शे-दिडशे नविन शब्दांची भर टाकली. ती यादी विदग्ध या अनुदिनीवर प्रकाशित केलीय. मनोगतावर इतर भाषांच्या शब्दांसाठी १०% मर्यादेचा नियम आहे. त्याचा मान ठेवुन मूळ लेखासाठी दुवा  देतोय.

हे शब्द मांडतांना अथवा तयार करतांना काही सूत्रे पाळलीत. ती म्हणजे -

१. नविन शब्दांत मूळ इंग्रजी शब्दाच्या उच्चारापेक्षा शक्यतो कमी अक्षरे असावी.
२. जोडाक्षरांचा वापर सहसा टाळवा जेणेकरून क्लिष्टता कमी वाटेल.
३. शब्दशः भाषांतराऐवजी अर्थवाही शब्दांच्या निर्मितीवर भर द्यावा.
४. नविन शब्दांची नाळ मराठी वळण आणि लयीस जोडलेली असावी.
५. शक्यतो शब्द काव्यात्म असावा.

हे नियम गणिताच्या रूपात कसे मांडावे किंवा अगदी नेमकी व्याख्या कशी करावी हे मला ठावुक नाही. जसे नविन शब्द पांचवा नियम पाळतो का हा बराचसा आडाख्याचा भाग आहे. तो व्यक्तीवर अवलंबुन असु शकतो.

ह्या पांच सूत्रांखेरीज नविन शब्द निर्माण करतांना अजुन कुठली पथ्ये पाळावीत असे आपले मत आहे? तसेच ही सूत्रे अजुन नेमक्या शब्दांत कशी मांडता येतील?

Post to Feed

२ व ५
बोल्ड - अक्षरे
आभार
नवीन मराठी शब्द
नविन शब्द
उत्तम उपक्रम
आभार
पुणे विद्यापीठाचे संज्ञाकोश
धन्यवाद

Typing help hide