भेट

माझिया हातात
नाचरे कंकण
वेड्या ग गंधाने
भरले अंगण



सावळ्या डोळ्यांची
हसलि किनार
कोवळ्या शब्दांचे
लाजरे शिंपण


नाचते तुझी हि
खट्याळ नजर
स्पर्शास जुईचे
सुगंधी कुंपण