जुलै २००६

ऐकावे ते नवलच- युरोपातील पूल

               औद्योगिक क्रांतीच्या काळादरम्यान आणि महायुद्धाच्या आधी युरोपात बरेच पूल बांधले गेले.त्यापैकी काही निवडक पुलांची माहिती येथे देणार आहे.   हे सर्व पूल स्थापत्यशास्त्रासाठी एक मोठा टप्पा होते असेच म्हणावे लागेल.  वर्णने कंटाळवाणी वाटू नयेत म्हणून थोडकयात माहिती देण्याचा प्रयत्न राहील. ज्या वाचकांना पुलांच्या स्थापत्यशास्त्राचा अधिक अभ्यास करायचा आहे त्यांच्याकरता मालिकेच्या शेवटी देलेली काही पुस्तकांची नावे आणि माहितीस्थळे  उपयोगी पडतील.

                 टस्कनीमधील 'टॉल ब्रीज' हे रोमन स्थापत्यशास्त्राचे वैशिष्ट आहे. त्याच्या काही अर्धवर्तूळाकार कमानी १४० फूटाच्या अंतरावर आहेत आणि खांबांची उंची १६० फूट आहे. ह्या मोठ्या कमानींचे दगड सिमेंट लावून पक्के बसवण्यात आले होते. 

 टॉल ब्रीज

DSC00974

            पॅसिसमधील अलेक्झांडर ३ हा सीईन नदीवर बांधलेला पूल हा सौंदर्यांचे प्रतीक आहे. ह्या पूलाच्या टोकांना असलेले उंच मनोरे(टॉवर) सोन्याच्या पेगासस पक्षाने नटले आहेत. त्यामुळे पुलाच्या सौंदर्यात भर पडली आहे. ह्या पुलाचा स्पॅन साधारण ३०० फूट आहे.  हा पूल रशियाचा राजा अलेक्झांडर तिसरा ह्याच्या सन्मानार्थ बांधला होता.
अलेक्झांडर ३DSC00954

               प्रेगमधील वल्टावा नदीवरील चार्ल्स ब्रीज १३५७ मध्ये पाचव्या चार्ल्स ने बांधायला सुरुवात केली व त्याचे बांधकाम १५०३ मध्ये पूर्ण झाले. आजतागायत बांधकामास सर्वात जास्त कालावधी लागलेला पूल म्हणून ह्याचे नाव घेतले जाते.

               बुडापेस्ट मध्ये १९व्या शतकाच्या सुरुवातीला डॅनुब नदीवर बांधलेला चेन ब्रीज हा चेन सस्पेन्शन ब्रीजचे उदाहरण आहे. मूळ वास्तू जरी दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान कोसळली तरी हंगेरीयन लोकांनी त्याचे पुनरज्जीवन करून १९४९ मध्ये राष्ट्रीय स्मारक उभारले आहे.

चेन ब्रीज

 DSC00957

                   १८९४ मध्ये लंडमधील थेम्स नदीवर उभारलेला टॉवर ब्रीज हे बॅस्कूल प्रकारच्या ड्रॉ ब्रीजचे एक उदाहरण आहे. हा पूल लहान असला तरी त्याची रचना अतिशय आकर्षक आहे.  त्याच्या दोन्ही मनोऱ्यामधील अंतर फक्त दोनशे फूट आहे.

 टॉवर ब्रीज

 

DSC00956

 

               रोबर्ट मिलार्ट याचे नाव स्थापथ्यतज्ञांमध्ये आदराने घेतले जाते. १९०५ साली स्वित्झर्लंड मध्ये रॉबर्ट मिलार्टने पूर्ण केलेला पहिला पूल म्हणजे टॅवॅन्सा ब्रीज होय. 'रिएनफोर्सड कॉन्क्रीटचे तंत्रज्ञान वापरलेला हा पहिलाच पूल होता. ह्याला तीन हिंजेस होत्या. त्यानंतर १९३४ साली पूर्ण झालेला टॉस नदीवरील पूल हा 'डेक स्निफन्ड' कमानीचा मिलार्टचा आणखी एक पूल होता.

टॅवॅन्सा ब्रीज

 

DSC00968

 

            जवळजवळ सहा शतकांपर्यंत इंग्लंडमध्ये थेम्स नदीवर लंडन ब्रीज हाच एक पूल होता. त्याला १९ कमानी होत्या. त्यांचे स्पॅन १५ ते ३४ फूट होते आणि त्यांची रुंदी १८-२६ फूट होती.  जुना लंडन ब्रीज दुकानांनी व माणसांनी गजबजलेला असे. त्यावर नेहमी होणारे अपघात आणि लागणाऱ्या आगींमुळे औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीला तो पूल अखेर जॉन रेने याच्या नव्या पुलाने बदलावा लागला. 

            थेम्स नदीवरील क्वीन एलिझाबेथ ब्रीज हा 'केबल स्टेड' पूल आहे. पुलांच्या रचनेतील व स्थापत्यशास्त्रातील ही नवीन प्रगती मानली जाते. या पुलाच्या बांधणीत स्टीलच्या खांबांना  तारा डायगोनली अडकवल्या आहेत.

 

DSC00984

जर्मनीतील हॅम्बर्ग येथे सुद्धा असाच एक केबलचा रीएनफोर्सड कॉन्क्रिटचा पूल आहे. त्याचे छायाचित्र शेजारी दिले आहे.  

 

DSC00985

               यापुढील भागात आपण अमेरिकेतील ब्रुकलिन ब्रीज, गोल्डन गेट ब्रीज , ब्रीज ऑफ अमेरिका, सिऍटलचा ड्रॉ ब्रीज आणि वॅनेझाऱो नॅरोज ब्रीज इत्यादी पुलांची माहिती व छायाचित्रे पाहू.

Post to Feedछान माहिती
रंजक
छान
फोटू
आयफ़ेल टॉवर
बरोबर, याविषयी अधिक माहिती
सुंदर माहिती...

Typing help hide