"नात... तुझं अन माझं"

दुसरीच कविता असल्यामुळे व कवितेच्या कुठल्या प्रकारात मोडते हे माहित नसल्यामुळे "कविता" या लेखन प्रकारात लिहली आहे. (कदाचीत चारोळ्या या प्रकारात मोडत असावी...)

 

                             "नात... तुझं अन माझं"

 

नात...  तुझं अन माझं ,

आळवाच्या पानावरच्या थेंबासारख...

सहवासात असतात ते पण,

एकजीव मात्र होत नाहीत... 

 


नात...  तुझं अन माझं ,

नदीच्या दोन किनाऱ्यांसारख...

बरोबर असतात ते पण,

ते कधी मिळत नाहीत... 

 


नात...  तुझं अन माझं ,


समुद्रकिनाऱ्यावरच्या दगडावरच्या शेवाळासारख...

उगवतात तिथे ते पण,

रुजत मात्र नाहीत... 

 



नात...  तुझं अन माझं ,

दोन डोळ्यांसारख...

जवळजवळ असतात ते पण,

कधी एकमेकाला पाहु शकत नाहीत... 

 



नात...  तुझं अन माझं ,

ग्रीष्मातल्या मृगजळासारख...

भासत पण,

असत नाही... 

 

जयदीप.