बॉम्ब स्फोट दोष आणि जबाबदारी

बॉम्ब स्फोट झाल्यावर मिडिया मध्ये सगळीकडे सरसकट मुसलमानांना दोष देऊ नका असा सूर दिसला. दोष मुसलमान समाजाचा नाही, पण जबाबदारी निश्चितच आहे. २० एक लोक तुमच्या मुहल्ल्यात राहून RDX जमवतात, बॉम्ब बनवतात, सगळं planning करतात आणि कोणालाच चाहूल लागत नाही? ही काही भावनेच्या भरात येऊन केलेली गोष्ट नव्हती, हा ३-४ महिने रचलेला कट होता. अशा भयानक कटाची चाहूल लागल्यावर त्या बाबतीत काही करण्याची जबाबदारी तुमच्या समाजाची नाही? माझ्या मुलाने कोणाचा खून केला तर दोष माझा नाही, पण जबाबदारी नक्कीच माझी आहे.


मुसलमान नेते आता काय करू शकतातः



  1. कुठलेही कारण न देता निरपराध लोकांच्या हत्येचा स्पष्ट शब्दात निषेध करा
  2. ह्या कटाची माहिती असेल त्यांनी पोलिसांना ती माहिती द्यावी असा फतवा काढा
  3. असली कृत्ये हराम आहेत असं जाहीर करा
  4. मुसलमानांना पोलिसांत भरती होण्यास प्रोत्साहन द्या

आपण काय करू शकतोः



  1. ही चर्चा आपल्या मित्रांबरोबर करा, हिंदू आणि मुसलमान
  2. मुसलमान नेते काय करू शकतात हे आपल्या मिडिया मध्ये जमेल तिथे सभ्य भाषेत बोलून दाखवा, ई-मेल करा
  3. भारतात असाल तर तुमच्या आमदार खासदार यांना जाऊन भेटा आणि सभ्य भाषेत मुसलमान काय करू शकतात हे समजवून द्या
  4. "They need to do more" हे कुठल्याही चर्चेत म्हणायला विसरू नका

३०-५० लाख लोक रोज लोकलने प्रवास करतात. तिथे बॉम्बस्फोट थांबवणं पोलिसांसाठी अशक्य आहे. मुसलमान धार्मिक नेतेच ते थांबवू शकतात आणि त्यांनी तसं करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणणं आपलं आणि मीडियाचं काम आहे.