व्यक्तीपूजा नाही ! वस्तुनिष्ठता

मी नुकताच मनोगत चा सभासद झालो आणि मनोगत वरील काही जुने लेख/चर्चा वाचत होतो. त्यात मला ही चर्चा दिसली. त्यावरून काही विचार माझ्या मनात आले ते मांडत आहे.

मी वाचलेल्या चर्चेचा विषय होता - भारतात वाढलेली बूवाबाजी/  साधू -
स्वामी - महाराज यांची प्रकरणं वगैरे वगैरे. मला वाटत की या सर्व
गोष्टींसाठी आपल्या सर्वांची मानसिकता थोड्याफार प्रमाणात जबाबदार आहे.
एखाद्या व्यक्तिच्या गुणांचे अवलोकन तसेच अवगुणांची टीका ही "वस्तुनिष्ठ"
पद्धतीने होणे आवश्यक आहे. कोणत्याही माणसात गूण व अवगूण हे दोन्ही
असतातच. "The greater the front side, the greater the back side" अशी एक म्हण आहे. त्या प्रमाणे प्रसिद्ध व्यक्तींचे अवगूण तर भिंगातून पाहिल्या सारखे जास्तच मोठे दिसतात. पण भारतीय समाजात एखाद्या व्यक्ती बद्दल लोकांचा दृष्टीकोन हा
बहुतेक वेळा वस्तुनिष्ठ आसतो असे वाटत नाही.

वस्तुनिष दृष्टिकोन म्हणजे काय हो?

वस्तुनिष्ठ म्हणजेः
१. एखादी व्यक्ती ही सर्व प्रथम "माणूस" आहे... "अतिमानव" (superhuman) नाही. माणूस म्हणजे त्यात गूण व त्रुटी हे दोन्ही असणारच ही जाणीव.
२. ह्या जाणीव ठेवूनच व्यक्तीच्या गुणांची स्तुती करणे (मर्यादे बाहेर नाही... ओव्या रचणे किंवा गोडवे गाणे नव्हे.) व त्या गुणांचे अनुवर्तन करणे.
३. त्याच प्रमाणे अवगुणांची टीका करताना देखील आपण स्वतः देखील माणूस आहोत ही जाणीव ठेवून, नेमके दोष दर्शवणे किंवा टीका करणे.

या उलट आपल्या कडे काय दिसतेः
१. एखाद्या व्यक्तीला "महात्मा" "महाराज" वगैरे समजून "देवत्व" बहाल करणे. त्या व्यक्तीची पूजा करणे.
२. आपण ज्यांना देवत्व बहाल केलं आहे त्या व्यक्तीचे कोणतेही दोष न बघणे. त्या व्यक्तीची टीका सहन न करणे.

गांधी, टिळक, नेहरू, सावरकर असोत किंवा अमुक महाराज, तमूक स्वामी, फलाणा देवी/माता असोत... सर्वांच्या बाबतीत आपण केवळ पराकोटीचे "भक्त", "फॅन","*** वादी" असतो... किंवा मग त्या व्यक्तीचा सर्वतोपरी द्वेष करतो आणी सर्व बाबतीत त्या व्यक्तीची टीका करतो. एखाद्या व्यक्तीचे नुसते गूण किंवा नुसते अवगूणच पाहणे हा एक प्रकारचा आंधळेपणाच नाही का?

वस्तुनिष्ठ पणे जेव्हा आपण व्यक्तीचे (राजकीय असो वा धार्मीक असो) मूल्यमापन करायला लागू तेव्हा ह्या साधू-महाराज यांच्या मुळे वारंवार निर्माण होणाऱ्या अनेक समस्या कमी होतील.

आपल्याला काय वाटतं?