विरघळून चंद्र आज...

आज व.पुं. चे 'भुलभुलैया' वाचत होतो. एका कथेत कवितेची एक ओळ वाचली आणि ती कविता पूर्ण वाचावी वाटली. आणि मग (अर्थातच) मनोगत ची आठवण आली.


ती ओळ अशी आहे -


'विरघळून चंद्र आज रक्तातून वाहे'


कोणाला जर ही कविता माहीत असेल तर कृपया इथे लिहा ना.


----------------------------------


व.पुं. च्याच 'ही वाट एकटीची' ह्या कादंबरीत वाचलेल्या मनमोहन नातूंच्या ह्या ओळी -


कळीने फुलावे, असे फुलावे, की देठांनीही हसावे.


रमणीने लाजावे, असे लाजावे, की स्तनांचेही गाल व्हावे.


कवीने लिहावे, असे लिहावे, की कागदाने हात व्हावे.


ही कविता एवढीच आहे का? नसल्यास हिच्याही उरलेल्या ओळी कोणी लिहिल्यास छान होईल.


----------------------------------


आणि 'नववधू प्रिया मी बावरते' माहीत आहे का कोणाला?


मी खूपच 'डिमांड्स' करतोय का?  काय करू, ती 'विरघळून चंद्र आज रक्तातून वाहे'  ओळ आत्ता वाचली आणि एकदम ह्या बाकीच्याही अर्ध्यामुर्ध्या माहीत असलेल्या कविता आठवल्या.


वाट बघतोय...