लोकमान्याना काळ्या पाण्याची शिक्षा

महाराष्ट्राच्या विभूषणाला, आर्यधर्माच्या अभिमानाला, नीतीमत्तेच्या निपुणतेला, व स्वदेशप्रीतीच्या उद्भवाला,


त्या बाल गंगाधर तिलकाला काळ्या पाण्याची शिक्षा झाल्या पासून ज्याच्या ऱ्हिदयात त्वेष आलेला नाही व ज्याच्या मस्तकात भंयंकर खळबळाट झालेला नाही असा खऱ्या अंतःकरणाचा एकही हिंदु आढळणे दुर्मिळ आहे.


.................


अशा संधीस या स्वयंस्फ़ूर्त राष्ट्रीय एकवृत्तीला दे. गोपाळ


कृष्ण गोखले यांनी गालबोट लावले नसते तर कितीतरी बरे झाले असते! टिळ्कांच्या शिक्षेची वार्ता व त्या आघाताने दबून न जाता कर्तव्य करण्याची महाराष्ट्राचे अंगात संचारलेली जास्तच द्धृढनिश्चयात्मकता यांची हकीकत ऐकून इंग्लंडमधील एकूणएक हिंदी मनुष्याच्या मनाची काही विलक्षण स्थिती झालेली होती............


त्या महात्म्याचे (तिलक बरं कां ! 'ते' नव्हे) गुणवर्णनासाठी व त्या महाराष्ट्राचे सहानुभूतीसाठी इंग्लंडमधल्या हिंदी समाजातर्फ़े एक सभा भरलीच पाहिजे अशी प्रत्येकाच्या मनात सहाजिकपणे उत्कंठा लागली. वस्तविक दे.गोखले यानीच या कामी पुढाकार घ्यावयास हवा होता. परंतु ते पुढे आले नाहीत म्हणून इतर उभय पक्षातील लोकांनी सर्व हिंदी रहिवाशांची सभा बोलावली. नेमस्त व जहाल हा भेद यत्किंचितही मनात न आणता सर्व दर्जाची व मताची मंडळी त्या सभेस आली होती. सभेचे ठिकाण कॅक्स्टन हॉल हिंदी व युरोपियन स्त्रीपुरुषसमाजाने ते भरले होतेव अध्यक्षस्थानी दे. बॅ. पारेख हे नेमस्त पक्षाचे अध्वर्यु जे दादाभाईंचे वेळेपासून राजकारणात झटत असलेले गृहस्थ होते. अशा या सभेला गोखल्यांनी मदत देऊ नये हे उद्वेगजनक होय. त्याना अध्यक्षस्थान स्विकारण्याबद्दल जेव्हा विचारले गेले तेव्हा त्यानी ते नाकारलेच! सभेत शिक्षेची निषेध करण्याविषयी काही बोलाल कां न्हणून विनंती केली असता तीही त्यानी मान्य केली नाहीच, पण याही पुढे जाऊन सभेला हजर राहण्याचीही तसदी त्यानी घेतली नाही! प्रत्येक फ़ाटक्या साहेबाच्या घराचे ऊंबरठे झिजवण्याची एकही संधि जे फ़ुकट दवडीत नाहीत त्याना टिळ्कांच्या शिक्षेबद्दल उघडपणे निषेधाचा उच्चार करण्याची व तशा सभेला हजर राहण्याची आवश्यकताही कळू नये हे काही सौजन्याचे निदर्शक खात्रीने नव्हे!दे. गोपाळराव गोखल्यांसंबंधी अजून्पर्यंत जी काही पूज्यबुद्धी लोकांत आहे, तिच्या योगाने लोक त्यांच्या हजेरीस-गैरहजेरीस महत्व देत असतात.परंतु सर्व राष्ट्राच्या स्वयंस्फ़ूर्त विचाराला व मनोवृत्तीला टिळकांच्या हद्दपारीसारख्या अत्यंत कोमल प्रसंगी असा निरर्थक अडथळा करुन त्यानी काय महत्वाची देशसेवा बजावली ते गोपाळरावांचे  गोपाळरावांनाच माहीत! बाकी सर्वांना त्यांच्या त्या संदिग्ध व अप्रस्तुत वर्तनाचा वीट येऊन त्याच  कॅक्स्टन हॉलात भरलेल्या सभेत गोखल्यांच्या या कर्तव्यपराङ्ममुखतेचा निषेध  करण्याचा ठराव पास करण्यात आला.मुंबईला ओरिएंटल रिव्ह्यू या पत्राने व इंग्लंडात दे. गोपाळ


कृष्ण गोखले यांनी राष्ट्राच्या एकतानतेचा जो हा भंग केला त्याने राष्ट्राचे तर राहोच, त्यांचे तरी हित होवो म्हणजे झाले!


-------ता. २१ सप्टेंबर १९०८


संदर्भः लंडनची बातमीपत्रे