आयुष्यावर बोलु काही

"आयुष्यावर बोलु काही"यामधून ही माझी अतिशय आवडीची कविता. इथे लिहाविशी वाटली म्हणून, यातील शब्द न शब्द माझ्या बाबतीत खरा ठरला होता.


 


 


गाडी सुटली रुमाल हलले


गाडी सुटली रुमाल हलले, क्षणात डोळे टचकन ओले.


गाडी सुटली पडले चेहरे, क्षण साधाया हसरे झाले.


गाडी सुटली, हातामधुनी हात कापरा तरी सुटेना,


अंतरातली ओली माया,तुटुदे म्हटले तरी तुटेना.


कारे ईतका लळा लावूनी नंतर मग ही गाडी सुटते,


डोळ्यांदेखत सरकत जाते,आठवनींचा ठिपका होते.


 


गाडी गेली फलाटावरती निःश्वासांचा कचरा झाला,


गाडी गेली डोळ्यांमधल्या निर्धाराचा पारा फुटला.


गाडी गेली डोळ्यांमधल्या निर्धाराचा पारा फुटला.


                                       


(सुहास)