बॉलिवूड बोल!

गेल्या ४-५ वर्षांत एरवी अभिजात संगीत आणि भावगीतं आवडणारा मी अचानक अद्यावत बॉलीवूड संगीत सुद्धा ऐकायला लागलो आहे. कदाचित इस्माईल दरबार, नाहीतर शंकर एहसान लॉय, इ. नवीन संगीत निर्देशक आल्यामुळे किंवा जास्त स्वकल्पित ( म्हणजे अननुकरणीत ) संगीत असल्यामुळे किंवा एकंदरच जास्त वैविध्य असल्यामुळे कोणास ठाऊक, पण आता नवीन कुठल्या चित्रपटाची गाणी येणार आहेत ह्यावर माझं लक्ष असतं. अर्थात चांगल्या गाण्यांबरोबर कचरा पण चिक्कार असतो (उदा. हिमेशची बरीचशी गाणी), पण बॉलिवूडची काही गाणी आवडीच्या शिखरापर्यंत जाऊन पोहोचतात आणि हे जास्त वारंवार होऊ लागलं आहे.

हे कसं घडलं ह्यावर विचार केलातर मला वाटतं की वैविध्य, नावीन्यपूर्ण संगीत, अनेक भिन्न संगीतांचे मिश्रण, इ. गोष्टी लोभस वाटतात. मला आवडलेल्या काही खास संगीतात 'धूम', 'बंटी और बबली' आणि 'देवदास' आहेत. नुकतंच ऐकलेलं 'एक मै और एक तू है' हे ब्लफमास्टर मधलं गाणं वारंवार ऐकतो आहे!

कुणाला असा गेल्या ४-५ वर्षात फरक जाणवला आहे का?