ऑगस्ट १८ २००६

स्वातंत्र्य सैनिक

सदर कथा माझ्या आईने लिहीलेली आहे,ती भारतात व मी भारताबाहेर असल्यामुळे तिचे शब्द जसेच्या तसे लिहायचा प्रयत्न करणार आहे, तरी चु. भु.द्या. घ्या.

 

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नुकताच अप्पांचा शनिवार वाड्यावर सत्कार झाला होत आणि दहा हजार रुपयांची थैलीही भेट मिळाली होती; पण अप्पांनी ती अनाथाश्रमाला देउन टाकली.

  अप्पा म्हणजे सरीताचे सासरे, एक स्वातंत्र्य सैनिक आणि एक देखणं व्यक्तिमत्व - गोरा पान रंग, सहा फ़ुट ऊंच, अंगात पांढरे धोतर आणि सदरा, हातात काठी पण ती टेकायला आधाराला नाही बाका प्रसंग आलाच तर लढायला.वयाच्या बाराव्या वर्षापासुन अप्पा भारत मातेव्ही सेवा करत होते,याचा मोबदला मात्र त्यांनी कधी मागितला नव्हता.उलट ते म्हणत, "माझी मुले मल पोसायला समर्थ आहेत, मला नको काही पेन्शन वगैरे."

अप्पांची सरीताला खुप मदत असायची अगदी भाजी चिरण्यापासुन कपडे वाळत टाकण्यापर्यन्त ‌सुरुवातीला त्रास झाला मग सवय आणि आता तर गरजच!सकाळी वर्तमान पत्रवाचताना सरीता म्हणाली, " अप्पा बातमी वाचलीत का? स्वातंत्र्य सैनिकांना म्हणे प्रवास भाड्यात सवलत देणार आहेत, अर्ज भरुन दिला की झाले!"त्यावर अप्पा म्हणाले,"मला नको काही सवलत वगैरे. भारत माता माझी आई आहे, तिच्य सेवेचे मी पैसे घेउ? काय ग सरीता तु तुझ्या आईची सेवा केलीस की पैसे घेतेस तिच्याकडुन?" चिडले की अप्पांची अशी बडबड सुरु व्यायची, मग त्यांचा राग शांत करण्यासाठी मुलं त्यांना म्हणायची," अप्पा ती भुमिगत झालात तेंव्हाची गंमत सांगा ना? नाहीतर ती १९४२ ग्या चळवळीची!" मग हळुहळु कळी खुलायची, सुरुवातीपासून शेवत्पर्यन्त एक तासाचा कार्यक्रम असायचा मधुनच घोषणा वगैरे तर ठरलेलेच असायचे. 

असेच एकदा काश्मिरला जायचे बेत घडु लागले. ह्या एळेस अप्पांनाही घेउन जायचे असे अवि-सरीताच्या मनात आले, पण खर्चाचामेळ काही जमेना.दोघांना एकच उपाय दिसत होता,अप्पांची अर्जावर सही घेणे! पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण?

पण एक दिवस बँकेच्या कागदांवर सही घेताना तिने अप्पांची अर्जावर पण सही घेतली, तरी अप्पांनी विचारले होतेच की हा सवलतीचा अर्ज नाही ना? तिला खुप आनंद झाला होता.एक महीना राहीला होता निघायला. कपड्यांच्या घड्या करताना ती विचार करत होती," आम्हीही मध्यम वर्गीय आहोत,इतक्या माणसांचा खर्च अम्हालाही परवडायला हवा ना? अप्पांना काय जातयं म्हणायला मुलं खर्च करतील म्हणुन?"

खरेदी आणि तयारी ह्यात महीना कधी संपला कळलेही नाही!निघायचा दिवस उजाडला ,सगळ्यांची आवरा आवरी सुरु झाली. रोज पाचच्या ठोक्याला उठणारे अप्पा आज सात वाजुन गेले तरी कसे उठले नहीत ह्या चे सरीता आश्च्रर्य वाटत होते. गॅसवर चहा ठेवुन ती अप्पांना उठवायला गेलि, हाका मारुन उठेनात म्हणुन त्यांना हात लावला आणि  तिच्या काळजाचा ठोकाच चुकला.तिने अविला हाक मारुन डॉक्टरांना बोलवायला सांगितले. डॉक्टरांनी अप्पांना तपासले. जे व्हायला नको तेच झाले होते, रत्री झोपेतच अप्पा हे जग सोडुन गेले होते.

अप्पा गेल्याचे सरीताला राहुन राहुन वाइट वाटत होते, "माझ्यामुळेच अप्पा गेले.मी त्यांना फ़सवुन अर्जावर त्यांची सही घेतली." तिच्या डोळ्यांतून अश्रु वाहत होते आणि ती विचार करत होती,"अप्पा, तुम्ही नाहीच अलात ना सवलतीच्या तिकीटात?" एअढे म्हणुन तिने मनतल्य मनात स्वातंत्र्य सैनिकाला सलामी दिली.

                                             -    सौ. विजया काळे.

Post to Feedविलक्षण योगायोग
खरे देशभक्त
असेच

Typing help hide