सप्टेंबर २००८

आधी लिहिलेल्या लेखाचे शुद्धलेखन कसे तपासावे?

१. त्या लेखाच्या पानावर जा.
२.
    २क) जर प्रकाशित केलेला नसेल तर
    २ख) जर कोणी प्रतिसाद दिला नसेल तर
वर 'संपादन' अशी पाटी(टॅब) दिसेल, त्यावर टिचकी मारा.
३. लेख प्रकाशित करायच्या आधी ज्या पानावर होतात त्याच पानावर जाल.
४. लिहिताना लुकलुकणारा निर्देशक (कर्सर) लिहायच्या खिडकीत घेऊन जा.
५. याहू/गुगल च्या कळपट्टीची पॉप अप खिडक्यांना आडकाठी असेल तर काढा.
६. मनोगत वर सगळीकडे टंकीत करण्याच्या जागांच्या उजवीकडे वर  हे चित्र आहे. त्यावर टिचकी मारा. शुद्धिचिकित्सक चालू होईल.
७. डावीकडे वरच्या बाजूला गमभन सुचवण्या देईल. ज्या पटतील त्या घ्या बाकीच्या 'राहू द्या'.
८. 'झाले' वर टिचकी मारायला विसरू नका.
९. 'प्रकाशित करण्यायोग्य' असे म्हणून प्रकाशित करा.
१०. 'गमभन' 'विषय' तपासत नाही. म्हणून शीर्षक लिहायच्या जागेत सर्वात वर अथवा खाली टंकीत करा आणि तपासून झाल्यावर तिथून कापून 'विषय' इथे चिकटवा.
११. जोवर तुमच्या लेखनाला कोणी प्रतिसाद देत नाही तोवर तुम्ही हे कितीही वेळा करू शकता.

Post to FeedTyping help hide