वाचाळस्पती

प्रथम मलाही नाम्या सारखेच वाटले की मनोगती इथे आपले कार्य लिहायला लाजतात का ? की इथे नुसते 'वाचाळस्पती' आहेत. पण तुमचा प्रतिसाद पाहून इथे 'क्रियेवीण...' यावर विश्वास ठेवणारी लोकही आहेत हे पटले.


**** वरील मजकूर श्री मोरू ह्यांनी आपण समाजासाठी काय करता? (समाजकार्य)  ह्या ठीकाणी व्यक्त केले त्यावर माझे मत.


 



सुरवातीला मला देखील असंच वाटायचं..... पण नाही हो सर्वच काही वाचाळस्पती नाहीत... काही लोक आहेत जे खरोखरच मदतीला तयार असतात... पण त्या लोकांना आपल्या कार्याचा ढंढोरा वाजवायचा नसतो अथवा त्यांना आपले कार्य सार्वजनिक करणे / उल्लेख देखिल करणे बरोबर वाटत नाही.


मी ही ह्याच मताचा आहे कारण मदत कार्य करणे हे आपले समाजावर उपकार नसून ही आपली जबाबदारी आहे.. आपण काही गांधी अथवा मदर तेरसा नाही आहोत अथवा आपल्या समाज कार्याची तेवढी उंची नसावी पण त्यामुळे आपल्या कार्याचा समाजसेवेचे महत्त्व कमी होत नाही. ही जबाबदारी ओळखावे व आपले कार्य करत जावे... ह्याचा अर्थ खारीचा वाट.....


कोणी तरी लिहिले ले आहे की ह्या हाताने काय केले ते दुसऱ्या हाताला देखील कळू नये.


बाकी सगळे शब्दांचेच खेळ ! 
राग लोभ असावा... जरा लहान तोंडी मोठा घास !


 


आपलाच


शनी