पहिल्या नजरेतलं प्रेम

प्रथम तुज पाहता मी वेडापिसा झालो


गर्दीत असूनही मी एकटाच उरलो


काय हीच का ती प्रेमाची वेळ ?


की मीच करतोय मनाशी खेळ ?


मंडळी,


आयुष्यात कधीतरी अचानक कोणीतरी तुमच्या पुढे ऊभे राहते आणि तुम्हाला साक्षात्कार होतो की हीच ती व्यक्ती किंवा हाच तो जोडीदार माझ्या आयुष्यभराचा !


मला आच्छर्य वाटते की ना ओळख ना पाळख पण अशा प्रेमात अडकलेले प्रेमवीर 'ती व्यक्ती' आपल्या आयुष्यात यावी या साठी जीवाचा आटापिटा करायला तयार होतात. बरेचदा हे एकतर्फी प्रेम असते.


मला आठवते त्याप्रमाणे पुणे-सोलापूर रोडवर एक हॉटेल आहे 'Love at first-sight ' नावाचे. तर या हॉटेलाच्या नावामागचा किस्सा म्हणजे या हॉटेलाचा मालक आणि त्याची बायको, लग्नाआधी एका रेल्वेतील प्रवासात एकमेकांच्या प्रेमात पडले.


मग तुम्हाला काय वाटते खरंच असते का ते पहिल्या नजरेतलं प्रेम ?


की असते नुसते शारीरिक आकर्षण ? की निव्वळ कवी-कल्पना ?


- मोरू