किस्सा अभ्यासाचा

मी आणि लेकरु यांच्यात अभ्यासावरून वादंग अगदी ठरलेलेच असतात. त्याला अभ्यास न करण्यासाठी रोज नवी सबब सुचते आणि याला इतक्या शतश: सबबी रोज कशा काय सुचतात याचं मला आश्चर्यच वाटतं. एकदा महाशिवरात्रीचा उपास होता. छानपैकी साबूदाण्याची खिचडी वगैरे खाऊन आम्ही दोघं अभ्यासाला बसलो. अभ्यास का करावा या बद्दल माझी लेक्चरबाजी सुरु झाली. मी त्याला समजावू लागले...


''बेटा आपल्या पोटाला भूक लागली की मग आपण जेवतो की नै... काय काय जेवतो सांगा बरं... वरण भात भाजी पोळी हो की नै!  तशी या डोक्यातल्या बुद्धीला सुद्धा भूक लागते मग आपल्याला अभ्यास करावा लागतो गणित, सामान्य ज्ञान्य, भाषा. आपण रोज जेवतो की नाही तसाच रोज रोज अभ्यास सुद्धा केला पाहिजे बरं.''


लेकरु लगेच उत्तरलं ''म्हणजे आज अभ्यासाला सुट्‍टी ना!!! '' आणि मी निरुत्तर.