मराठीत लिहिणे कठीण नाही

मराठी वर्ड प्रोसेसर (ओपन ऑफिसचा रायटर) आपल्या संगणकावर स्थापित करून
मराठीमध्ये बराहाच्या मदतीने उत्तमरीत्या टाईप करता येते. चुकीचे शब्द
लाल रंगात अधोरेखित होतात. त्या शब्दांवर टिचकी मारली असता बरोबर शब्द
निवडता येतो.

दुर्दैवाने हा शूची अपूर्ण आहे. त्यामुळे बरेचसे बरोबर शब्दही लाल रंगात
दिसतात. अशा वेळी असे शब्द आपल्या संगणकाच्या मेमरीत सेव्ह करण्याचा
पर्याय स्वीकारावा.

शुद्धिचिकित्सकात भर पडून तो सर्वसमावेशक होई पर्यंत वाट पाहावी लागेल असे दिसते.

पण तोवर खाली दिलेल्या पानावरील  सूचनांनुसार  प्रयत्न करून पाहावयास काय  हरकत आहे?


http://tinyurl.com/tydyk 




>> इतके दिवस मी लिहीन लिहीन म्हणत होतो अखेर आज तो सुदिन आला.

>> लिहिण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही जमायला थोडा वेळ लागतोच.

अभिजित मोहोळकर यांच्या अखेर मला जमले या निवेदनावर प्रतिक्रिया
देण्यासाठी लिहिलेला हा मजकूर स्वतंत्र चर्चा विषय होऊ शकतो हे लक्षात
आल्यामुळे नवीन लेख म्हणून प्रसिद्ध केला आहे. याचा नवागतांना उपयोग होईल
असे वाटते.

मराठीत लिहिणे वाटते तितके कठीण मुळीच नाही.